मोदींना वाढदिवसानिमीत्त पाठविले पाच हजार पोस्ट कार्ड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदींना वाढदिवसानिमीत्त पाठविले पाच हजार पोस्ट कार्ड

कोपरगांव शहर प्रतिनिधी गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान या २० वर्षाच्या प्रशासकीय सेवेतून नरेंद्र मोदी यांनी गोर-गरीब घटकांपासून सर्व थरां

कोपरगावचा विकास हाच माझा ध्यास : आ.आशुतोष काळे
Ahmednagar : प्रेमदान हडकोतील रस्त्यावरील गाळे पाडण्यासाठी महापालिका सरसावली l LokNews24
श्रीगोंद्यात औद्योगिक वसाहतीची निर्मिती करा : उद्योगमंत्र्यांकडे मागणी

कोपरगांव शहर प्रतिनिधी

गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान या २० वर्षाच्या प्रशासकीय सेवेतून नरेंद्र मोदी यांनी गोर-गरीब घटकांपासून सर्व थरांतील प्रत्येकाचा उत्कर्ष साधला ही सेवा समर्पणाची आठवण म्हणून कोपरगांव विधानसभा मतदारसंघातून पाच हजार पोष्टकार्ड पाठविल्याची  माहिती भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. 

कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्यावतीने गुरुद्वारारोडवरील पक्ष कार्यालयात पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसानिमीत्त मतदार संघात घेण्यात आलेल्या सेवा सप्ताहाची माहिती तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी गुरुवारी दिली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यागमय वृत्तीतुन जनसंघाच्या शिस्तीत स्वतःला सिद्ध करत अगोदर गुजराथवासियांचा व  पंतप्रधान होऊन तमाम देशबांधवांचा उत्कर्ष साधला आहे., 

देशवासीयांसाठी कृषी सन्मान  (वार्षिक मानधन ६हजार),स्वच्छ भारत अभियान (शौचालये), कोरोना लसीकरण मोहीम, उज्वला गॅस, पंतप्रधान पिक विमा, प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्नधान्य वाटप, प्रधानमंत्री आवास आदि योजना सफलतेने पूर्ण करून त्याचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवला आहे.  शेवटी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक साहेबराव कदम यांनी आभार मानले.

COMMENTS