मोठी घडामोड… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री थोरात गेले फडणवीसांच्या भेटीला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी घडामोड… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री थोरात गेले फडणवीसांच्या भेटीला

प्रतिनिधी : मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी वि

लाडकी बहीण योजनेचा राजकीय प्रचार सरकारी खर्चाने
Balasaheb Thorat : भारतीय जनता पार्टीचा जनाधार म्हणजे केवळ नौटंकी
कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी टाटा-एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र – महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी : मुंबई

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. 

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेस नेत्यांनी केली. 

त्यामुळे भाजपा काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

तर भाजपाकडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी भाजपाने आपला उमेदवार मागे घ्यावे, अशी अपेक्षा काँग्रेसची आहे. 

फडणवीस यांची भेट घेऊन काँग्रेस राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या विनंतीसंदर्भात चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS