मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

Homeताज्या बातम्यादेश

मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

शिलाँग : मेघालयात तणावपूर्ण परिस्थिती असून, काल उशीरा रात्री मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या निवासस्थानावर अज्ञातांनी पेट्रोल बॉब्म हल्ला केला. मुख्

सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्या !
आरोग्य भरती परीक्षेचा नियोजनाचा उडाला बोजवारा ; ऐनवेळी पुणे, नाशिक केंद्रावर प्रश्‍नपत्रिकांची टंचाई
पतीने केला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न | LOKNews24

शिलाँग : मेघालयात तणावपूर्ण परिस्थिती असून, काल उशीरा रात्री मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या निवासस्थानावर अज्ञातांनी पेट्रोल बॉब्म हल्ला केला. मुख्यमंत्र्यांचे हे निवासस्थान अप्पर शिलाँगच्या थर्ड माईल भागात स्थित आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही किंवा कोणतेही नुकसान झालेले नाही. पेट्रोलने भरलेली पहिली बाटली निवासस्थानाच्या पुढच्या भागात तर दुसरी बाटली घराच्या मागच्या भागात फेकण्यात आली. यामुळे आगही लागली परंतु, चौकीदाराने ताबडतोब ही आग विझवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री जवळपास 10.15 वाजता घडली. एका वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी मुख्यमंत्री निवासस्थानाच्या परिसरात पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या. परंतु, स्वातंत्र्य दिनालाच राज्याची राजधानी आणि आजुबाजुच्या भागात तोडफोड आणि आगीच्या घटनेनंतर राज्य सरकारकडून शिलाँगमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय. येत्या 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5.00 वाजेपर्यंत हा कर्फ्यू सुरू राहील. राज्यातील जवळपास चार जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली. मेघालयाचे माजी विद्रोही नेते चेरिशस्टरफिल्ड थांगख्यू यांच्या एन्काऊंटरनंतर या भागात हिंसाचाराच्या घटनेत वाढ झालीय. या घटनेनंतर राज्यातील परिस्थिती चिघळत असतानाच रविवारी सायंकाळी राज्याचे गृहमंत्री लखन रिंबुई यांनी तडकाफडकी आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा देताना त्यांनी मुख्यमंत्री संगमा यांना एक पत्रही लिहिलंय.

गृहमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा
मुख्यमंत्री कोनरड संगमा यांच्या निवासस्थानावर केलेल्या हल्लयानंतर पोलिसांनी छापेमारी करण्यात आली. ही कारवाई कायद्याच्या विरुद्ध जाऊन करण्यात येत असून, या घटनेवर मी दु:ख व्यक्त करतो, असे गृहमंत्री रिंबुई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सोबतच, आपल्याला लवकरात लवकर गृहमंत्रालयाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, असेही गृहमंत्री रिंबुई यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले. चेरिशस्टारफिल्ड यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करणे सोपे जाईल आणि सत्य परिस्थिती सर्वांसमोर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS