मुलाकडून वयोवृद्ध बापाचा खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलाकडून वयोवृद्ध बापाचा खून

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  दारू पिऊन पत्नीसमवेत वाद घालणार्‍या मुलाना समजून घालणार्‍या बापाला मारहाण करून जीव घेणार्‍या मुला विरोधात राहुरी पोलिस

शेत जमीन व्यवहार फसवणुक प्रकरणी महेश संचेतीवर कोतवालीतही गुन्हा दाखल
अहमदनगर : केडगावमध्ये ११ लाखांची सुगंधी सुपारी जप्त
सिगारेट दिली नाही म्हणून टपरी चालकावर तलवारीने प्राणघातक हल्ला

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

दारू पिऊन पत्नीसमवेत वाद घालणार्‍या मुलाना समजून घालणार्‍या बापाला मारहाण करून जीव घेणार्‍या मुला विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील वीजविहार, ताहाराबाद येथे माणुसकीला काळीमा फासणारी दुर्देवी घटना घडली. आरोपी ज्ञानेश्‍वर विठ्ठल हारदे (45 वर्ष) हा नेहमीच दारू पिऊन पत्नीशी वाद घालत असे. 27 ऑक्टोंबर रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास पत्नी सुनिता हारदे यांच्याशी ज्ञानेश्‍वर हारदे हा दूध काढण्याच्या कारणावरून वाद घालत होता. दोघांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी वडील विठ्ठल तुळशिराम हारदे (72 वर्ष) यांनी तु नेहमीच दारू पिऊन भांडण करतो. पत्नीशी वाद घालू नको असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपी ज्ञानेश्‍वर हारदे याने बांबुने वडीलांना मारहाण केली. यामध्ये वयोवृद्ध विठ्ठल हारदे यांना पाठीवर, पोटात व हातापायांवर गंभीर मारहाण झाली. ते अत्यवस्थ होऊन जागेवर पडल्यानंतर त्यांना तातडीने ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी विठ्ठल हारदे यांना मृत घोषित केले. पोलिसांना घटनेची माहिती समजताच आरोपी ज्ञानेश्‍वर हारदे यास ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे व सहायक पोलिस निरीक्षक नीरज बोकिल यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्जेराव महिपती हारदे यांनी चुलते विठ्ठल हारदे यांचा खून केल्याप्रकरणी चुलत बंधू ज्ञानेश्‍वर हारदे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीरज बोकिल हे करीत आहेत.

COMMENTS