कोल्हापूर : नागरिकांनो! घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहोत. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील
कोल्हापूर : नागरिकांनो! घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहोत. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्र्यांनी शाहुपुरी ६ व्या गल्लीतील पूरबाधित राहिवाशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापुरात आले होते. आपत्कालीन स्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिल्याचे सांगून, २००५ व २०१९ पेक्षाही यावर्षीचा पूर भयंकर असून शासनाने आम्हाला भरीव मदत करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, खा.धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, आ. ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.
COMMENTS