मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेचा ‘मेगा प्लॅन’… १७७५ कोटी करणार खर्च…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेचा ‘मेगा प्लॅन’… १७७५ कोटी करणार खर्च…

प्रतिनिधी : मुंबई रेल्वे मार्गावरुन जाणारे पूल जुने झाले असल्याने धोकादायक स्थितीत आले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील शंभर वर्षे जुन्या पुलांचा

खासगी रुग्णालयांकडील लस साठयात होणार कपात l DAINIK LOKMNTHAN
osmanabad : आमदार तानाजी सावंत तुमचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील प्रेमाचा पुळका गेला कुठे ? l LokNews24
नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रतिनिधी : मुंबई

रेल्वे मार्गावरुन जाणारे पूल जुने झाले असल्याने धोकादायक स्थितीत आले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील शंभर वर्षे जुन्या पुलांचाही समावेश आहे. 

हा जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, हे काम संथगतीने सुरु आहे. 

मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेने पुलांच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार १२ पूल नव्याने बांधण्यासाठी आराखडा तयार केला गेला आहे.

पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने मोठी योजना आखली आहे. निवडणूक असल्याने बराच काळपूर्ण न झालेल्या कामांनाही गती मिळू आता लागली आहे. 

त्यानुसार मुंबईतील १२ धोकादायक पुलांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी तब्बल १ हजार ७७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या पुलांवर आकर्षक रोषणाई करण्याची मागणीही आता केली जात आहे.

महाराष्ट्र रेल इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हे पुल बांधण्यात येणार आहे.त्यासाठी पालिकेकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

पुढील वर्षाभरात टप्प्याटप्प्याने काम सुरु करुन २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. केबल स्टेड पध्दतीचे पूल बांधण्यात येणार असल्याने बांधकाम रखडणार नाही. 

तसेच, हे पूल पर्यटकांचेही आकर्षण ठरतील, असा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. भायखळा येथील व्हाय ब्रिज वगळता इतर रेल्वे मार्गावरील पूल हे दुपद्री आहेत. 

दक्षिण मुंबईतील सर्व पूल ब्रिटीशकालीन आहेत. नवीन पूल चौपद्री असणार आहेत. असतील. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे.

COMMENTS