मुंबईत 55 हजारांहून अधिक अॅक्टीव्ह रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत 55 हजारांहून अधिक अॅक्टीव्ह रुग्ण

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येसह सक्रीय रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
‘लव्ह जिहाद’ प्रकरणी मोठी कारवाई, सहा आरोपींवर मोक्का
मांजरीसोबत खेळतो म्हणून कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येसह सक्रीय रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या एका महिन्यात मुंबईतील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 55 हजार 005 वर पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच मुंबई पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर महापालिका आणि राज्य सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे डिसेंबर 2020 अखेरीस कोरोना आटोक्यात येत होता. मात्र, नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

मुंबईतील सक्रीय रुग्णांची सद्यस्थिती

1) 1 मार्च – 9690

2) 15 मार्च – 14582

3) 25 मार्च – 33961

4) 1 एप्रिल – 55005

गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 14 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या 55 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

COMMENTS