मुंबईत दर तासाला सापडतात १४८ रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत दर तासाला सापडतात १४८ रुग्ण

मुंबई गेल्या आठवडाभरात दर तासाला सरासरी १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही आता ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे.

नगर अर्बनच्या माजी संचालकांना खा. डॉ. विखेंचा पाठिंबा
लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर
राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात नाशिक राज्यात प्रथम

मुंबई / प्रतिनिधी : मुंबई गेल्या आठवडाभरात दर तासाला सरासरी १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही आता ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. राज्यात दिवसभरात ३५ हजार ७३६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून १६६ मृत्यूंची नोंद झाली. 

परिणामी, आता राज्यातील  कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ७३ हजार ४६१ झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ७३ झाला आहे. तर, ३ लाख ३ हजार ४७५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली. राज्यात पहिल्यांदाच  सर्वाधिक १६६ दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली. यापूर्वी, २३ मार्च रोजी १३१ मृत्यूंची नोंद झाली होती. मागील कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंच्या उच्चांकाची नोंद झाली आहे. मुंबईत  दिवसभरात नव्या ६ हजार १२३ बाधितांचे निदान झाले असून १२ जणांना जीव गमवावा लागला. सलग तीन दिवस पाच हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानंतर शनिवारी शहरात सहा हजार १२३ रुग्णांची नोंद झाली, तर बळींचा आकडा १२ आहे. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ७५१ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ६४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात मृत्यू  झालेल्या १२ रुग्णांपैकी ९ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष आणि ५ महिलांचा यामध्ये समावेश होता. ८ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते.

COMMENTS