मुंबईत लवकरच चार नवे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. मुंबईत मे महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चार नवे जम्बो कोविड सेंटर तयार झालेले असतील.
मुंबई/प्रतिनिधीः मुंबईत लवकरच चार नवे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. मुंबईत मे महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चार नवे जम्बो कोविड सेंटर तयार झालेले असतील. त्यामुळे याआधीच्या सहा जम्बो कोविड सेंटरमध्ये आणखी चार सेंटरची भर पडेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
मुंबईत येत्या महिन्याभरात कांजुरमार्ग, मालाड, सायन आणि महालक्ष्मी येथे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. यातील कांजुरमार्ग कोविड सेंटरमध्ये तब्बल दोन हजार बेड्स आणि 200 आयसीयू बेड्सची व्यवस्था असणार आहे, असे सांगून ते म्हणाले, की जम्बो कोविड सेंटर उभारणीसाठी संबंधित एजन्सीसोबत महापालिका संपर्कात असून कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठीची ही पूर्वतयारी आहे. जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये याआधीच 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आता आयसीयू बेड्सची संख्या 200 वर पोहोचली असून कोरोनासाठी सर्वाधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था असणारे देशातील हे पहिले सेंटर ठरले आहे. सहा जम्बो कोविड सेंटरसोबतच आपल्याकडे आता आठ हजार सर्वसाधारण बेड्स आणि 500 आयसीयू बेड्स उपलब्ध झाले आहेत. याशिवाय बीकेसी येतील जम्बो सेंटरच्या विस्तारीकरणाचीही तयारी पालिकेने केली आहे. महालक्ष्मी येथील रेसकोर्समधील कोविड सेंटरचा वापर होत नसल्यामुळे रिकामे करण्यात आल्याच्या तीनच महिन्यांनंतर आता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा कोविड सेंटर उभारण्याचा विचार महापालिका करत आहे. यासाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने मदत करावी अशी महापालिकेची इच्छा आहे.
COMMENTS