कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड तालुक्यातील खर्डा येथे पोलीस ठाण्याला शासनाने मान्यता दिली आहे. गुरुवारी तसा शासन निर्णय जारी कर
कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड तालुक्यातील खर्डा येथे पोलीस ठाण्याला शासनाने मान्यता दिली आहे. गुरुवारी तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जत व जामखेड पोलीस ठाण्याचे विभाजन होणार आहे. नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
वाढत्या गुन्ह्यांच्या संख्येमुळे पोलिसांवर कामाचा ताण आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून नव्याने पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आता पोलीस महासंचालकांकडून हद्दनिश्चितीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे.
शासनाकडून मिरजगाव पोलीस ठाण्यासाठी ३५ तसेच खर्डा पोलीस ठाण्यासाठी ३५ पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येकी सहाय्यक पोलीस निरीक्षक १, पोलीस उपनिरीक्षक १, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ३, पोलीस हवालदार ६, पोलीस नाईक ९, पोलीस शिपाई १५ अशी पदे असणार आहेत.
COMMENTS