माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे निधन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले आहे. गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती.

मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसैनवर अफरातफरीचा गुन्हा
हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असल्याने सर्व समाज सुरक्षित : स्वामी गोविंद देवगिरी महाराज
..तर, ओबीसींचा राजकीय स्फोट दोघांनाही उद्ध्वस्त करेल !

मुंबई / प्रतिनिधीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले आहे. गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.

माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले होते. गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे. गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते; नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला.

COMMENTS