Homeताज्या बातम्या

माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल

राहुरी पोलिसांनी मध्यरात्री निवासस्थानावरुन केले अटक

देवळाली प्रवरा : श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक सहकारी बँकेचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे (वय 82 वर्ष) यांनी एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीत निशिकांत भोसले-पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार : केदार पाटील
जीवनात प्रकाश निर्माण करणार्‍या हेल्पिंग हँड्स संस्थेचे हे कार्य गौरवास्पदः सुपेकर
शिराळा शहरालगत चार महाकाय गव्यांचे दर्शन

देवळाली प्रवरा : श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक सहकारी बँकेचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे (वय 82 वर्ष) यांनी एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातमोठी खळबळ उडाली आहे.तर राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेवून अटक केली आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील एका 35 वर्षीय महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीत म्हटले आहे की. तुला बंगला घेवुन देतो, मुलाला नोकरी मिळून देतो असे आमिष दाखवून तालुक्यातील एका 35 वर्षीय महिलेला मादक पदार्थ देऊन श्रीरामपूर, मुंबई, दिल्ली आदी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे मुरकुटे यांनी संबंधित महिलेवर अत्याचार केला आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि नंबर 1070/24 आयपीसी 376 (2) एन 328, 498, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत त्या महिलेने म्हटले आहे की,10 एकर शेती घेऊन देतो, बंगला बांधून देतो असे अमिष दाखवून 2019 ते 2023 पासून तिच्यावर श्रीरामपूर, मुंबई, दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे दिलेल्या महिलेने म्हटले आहे. महिलेने राहुरी पोलिस ठाणे गाठत रात्री 10 वाजें दरम्यान केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो असे पुरावे दाखवल्याने पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी आमदार मुरकुटेंना अटक करताच कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्याते राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हि घटना काय वळण घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले.राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुरकुटेंचा शोध घेतला असता मुरकुटे हे रात्री उशीरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. मध्यरात्री 2ः30 च्या दरम्यान राहुरी पोलिस त्यांच्या निवासस्थानाच्या गँलरीत प्रवेश करुन ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणुन चौकशीनंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पोलिसांनी नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर सकाळी 11 ः 30 वाजता राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मुरकुटे यांच्या बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी ती महिला एका बँकेत नोकरी करीत असून पिडीत महिलेने मुरकुटे हे अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुरकुटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यामागे जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याचा हात असून या प्रकरणाला बळ दिल्याची नगर जिल्ह्यात मोठी चर्चा. मुरकुटे यांनी काही दिवसांपूर्वी एक एका सत्ताधारी राजकीय नेत्याच्या विरोधात राजकीय भाष्य केले होते. त्यामुळे या सत्ताधारी नेत्याने या महिलेस गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय पाठबळ दिले असल्याची चर्चा सुरु आहे. माजी आमदार मुरकुटे यांच्या बाजुने सुमारे एक तास युक्तीवाद करण्यात आला. अँड सुभाष चौधरी, तवले, पाटील यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने अँड श्रीमती गांधले व अँड रविंद्र गागरे यांनी बाजू मांडली. राहुरीत दाखल बलात्कार प्रकरणात अटक झाल्याची माहिती समजताच जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगले, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर,अंजुम शेख, सचिन पटारे, सनी काळे, गणेश छल्लारे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे यांच्यासह राहुरी पोलिस ठाणे व न्यायालयाच्या आवारात शेकोडो कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS