Homeमहाराष्ट्रअहमदनगर

माजी आमदारांनी केलेले आरोप अर्धवट माहितीवर आधारलेले : नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगावात बंदिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी मी अनेक वेळा माजी मंत्री विनोदजी तावडे यांना भेटून निधीची मागणी केली.

पांढऱ्या कपड्यातील साखर कारखानदार सर्वात मोठे दरोडेखोर ; शेट्टी
विकासासाठी आम्ही कोणाबरोबरही जाऊ शकतो ; खा. डॉ. विखेंची स्पष्ट भूमिका
डिंबे माणिकडोह बोगदा रद्द झाल्यास लाभक्षेत्रातील शेतीचे वाळवंट होईल ः  घनश्याम शेलार

कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगावात बंदिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी मी अनेक वेळा माजी मंत्री विनोदजी तावडे यांना भेटून निधीची मागणी केली.दि.२० नोव्हेंबर २०१७ ला २ कोटी रू. वैशीष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाला. सर्वे.न.२३७ मधील ४० आर जागा बंदिस्त नाट्यगृहासाठी मिळावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेने दि १७ जानेवारी २०१८ व दि १० ऑगस्ट २०१८ ला कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांचेकडे केली. 

५ जानेवारी २०१९  ला २३७ मधील जागेचा लांबी रुंदी असलेला नकाशा मागणी पत्र भूमी अभिलेख यांना दिले

याचबाबत  जानेवारी २०१९ मध्ये ३ स्मरणपत्र,साहायक अभियंता गोदावरी डावा कालवा उपविभाग कोपरगाव यांनाही दिले.दि.३० जानेवारी २०१९ ला कार्यकारी अभियंता नाशिक यांना पत्र पाठवून भाडेपट्टा करारनामा मसुदा व भाडे आकारणीचा दर देण्याची मागणी केली.दि.१८ फेब्रुवारी २०१९ सर्वसाधारण सभेत  तसा ठरावही(क्र.२०) केला.वारंवार मागणी-पाठपुरावा करूनही करारनामा मसुदा-भाडेपट्टा आकारणी दर उपलब्ध होत नाही म्हणून दि १७ मे २०१९ व दि.१६ जुलै २०१९  रोजी  पत्र देऊन त्यावेळच्या आ.कोल्हे यांना यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली होती.असेच पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी,अहमदनगर यांना पाठवून सहकार्य करण्याचे सुचविले होते.

दि.२४ जानेवारी २०१९ व दि २४ जून २०२० रोजी पुन्हा नाशिक पाटबंधारे विभाग यांना मागणी पत्र दिले,भेटही घेतली.निधी परत जाण्याचा धोकाही सांगितला.आ.आशुतोषजी काळे व पाटबंधारे विभागासोबत झालेल्या बैठकीत सर्वे नं.२३७ ऐवजी स.नं.१९३५ व १९३९ जागेपैकी एक एकर क क्षेत्रात सुसज्ज नाट्य करावे असा निर्णय झाला.

दि.२८ जुलै २०२० ला पाटबंधारे विभाग,नाशिक यांनी ३० वर्षाचे भाडे कराराने जागा हस्तांतरण व ५ वर्षाचे जागा आगाऊ भाडेपट्टा बाबत पत्र दिले.प्रती चौ.मी. चार हजार रू.प्रमाणे एकूण रुपये १ कोटी ५२ लाख ५४  हजार.

दि.१३ ऑक्टोबर २०२० ला प्रधान सचिव,जलसंपदा विभाग यांना भाडे कमी करून नाममात्र भाडे घ्यावे अशी विनंतीही केली.कारण २५ ते ३० लाख रू. वार्षिक भाडे देणे नगरपरिषदेला आर्थिकदृष्टीने परवडणारे नाही.

अशीच विनंती प्रधान सचिव,नगरविकास यांनाही केली.

पण २०१७-१८चा मंजूर निधी.३१ मार्च आधी खर्च न झाल्यास निधी परत जाण्याचा धोका होता.म्हणून हा मंजूर निधी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी वळविण्यात यावा असे शासनास कळविले.दि.२७ जानेवारी २०२१ ला तसे पत्र नगरविकास राज्य मंत्री ना.प्राजक्तजी तनपुरे यांनाही दिले. अहमदनगर येथील बैठकीत मी नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे व प्रधान सचिव श्री.पाठक साहेब यांच्याकडेही” हा निधी परत जाऊ न देता प्रशासकीय इमारत बांधकासाठी वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. मी,मुख्याधिकारी व आ.काळे यांनी प्रयत्न केल्यानेच २  कोटी निधी परत गेलेला नाही याचे भान माजी आमदारांना नाही.राज्यात भाजपाची सत्ता असतांनाही  भाडेपट्टा करारनामा ,मसूदा करून घ्यायला  तुम्ही नगरपरिषदेला मदत केली नाही.जाणीवपूर्वक “वहाडणे ” यांना  श्रेय मिळू नये तुम्ही सहकार्य केलेले नाही.नाट्य रसिकांबद्दल खोटा कळवळा दाखवू नका.तुम्ही बहुमताच्या जोरावर नुकतेच खुले नाट्यगृह नूतनीकरण काम (रू.९६ लाख) नामंजूर केलेले आहे.तुम्हाला कोपरगावचे नाट्य कलावंत व रसिक माफ करणार नाहीत.तुमच्या राजकिय नाट्याचा पडदा पडलेला आहे याचे भान ठेवा.नाट्यगृहाचा निधी मी माझ्या घरासाठी वापरणार नसून तुम्ही अर्धवट निधी आणून घाईघाईने कोनशीला लावलेल्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी च वापरणार आहे.

COMMENTS