महेश कोठारे यांनी बौध्द समाजाची जाहिर माफी मागितली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महेश कोठारे यांनी बौध्द समाजाची जाहिर माफी मागितली

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या सुख म्हणजे नक्की काय असत? या मालिकेमधील सँडी विश्वास नावाचे पात्र असलेली महिला ही लोकांना भूलथापा देवून, पैसे

जुन्या पेन्शनचे नवे वास्तव
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
आर्थिक उद्दिष्ट साध्यतेसाठी नियोजन आवश्यकच – स्वप्नील करवंदे

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या सुख म्हणजे नक्की काय असत? या मालिकेमधील सँडी विश्वास नावाचे पात्र असलेली महिला ही लोकांना भूलथापा देवून, पैसे दुप्पट करून मिळतील असे अमिष दाखवुन, करोडो रूपये लुटून फरार असते. जेंव्हा तिला कोर्टात आणले जाते. तेंव्हा तिने परिधान केलेल्या निळया ब्लाऊजवर पांढरे भगवान बुध्दांचे चित्र )दाखविण्यात आले आहे.अश्या प्रकारे विश्वशांतीदूत तथागत महाकारूणिक भगवान गौतम बुध्दांचा अवमान केल्याने, मालिकेचे निर्माते महेश कोठारे आणि  जिने भुमिका केली ते पात्र सँन्डी विश्वासचा बौध्द समाजबांधवानी जाहिर निषेध व्यक्त केला आहे. महेश कोठारे आणि सँन्डी विश्वासने बौध्द समाज बांधवाच्या भावना दुखावल्याबद्दल जाहिर माफी मागावी. अन्यथा रितसर कार्यवाही करण्यात येईल. अशी मागणी केली. त्याबद्दल  महेश कोठारे यांनी अनावधानाने झालेली चुक कबुल करत. बौध्द समाजबांधवांची जाहिर माफी मागितली.

COMMENTS