महिला सरपंचाना मिळणार आदर्श पुरस्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला सरपंचाना मिळणार आदर्श पुरस्कार

औरंगाबाद : राज्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणार्‍या महिला सरपंचांना आदर्श पुरस्कार देण्याची घोषणा ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील : डॉ. भागवत कराड
सहा महिन्यात मराठा समाजाला आरक्षण द्या
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

औरंगाबाद : राज्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणार्‍या महिला सरपंचांना आदर्श पुरस्कार देण्याची घोषणा ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी केली. जिल्हा परिषदेच्या वतीने औरंगाबादमध्ये महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते.
राज्य आणि जिल्हा पातळीवर आदर्श महिला सरपंच पुरस्काराचे वितरण केले जाईल. या पुरस्काराचे नाव स्व. मीनाताई ठाकरे आदर्श महिला सरपंच पुरस्कार असे असेल. पहिला पुरस्कार 25 लाख रुपये रोख रकमेचा असेल. तसेच आणखी पाच जणांना आदर्श सरपंचाचा पुरस्कार देण्यात येईल. येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती सत्तार यांनी दिली.

आपल्या कामाचा ठसा उमटावा : डॉ. नीलम गोर्‍हे
महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. गाव पातळीवरील महिला ही राजकारणाच्या माध्यमातून गावाच्या विकासात हातभार लावत आहे. हे काम करतांना बर्‍याच अडचणींचाही सामना करावा लागत असतो. त्यामुळे प्रत्येक महिला सरपंचांनी शासन कार्यपद्धतीचे वाचन, अभ्यास करावा, स्वत:चे संवाद कौशल्य वाढवावे. आपण कुठल्याही दबावाला न झुकता व विरोधाला न जुमानता संयमाने प्रतिकुल परिस्थितीला अनुकुल बनवू शकतो, असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले. ज्या माध्यमातून आपण आपल्या गावाला आरोग्य, शिक्षण, पाणी, महिला सक्षमीकरण व इतर माध्यमातून समृद्ध बनवू शकतो. जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायत सरपंच भास्कर पेरे यांनी देखील उत्कृष्ट कार्य करित गावाला समृद्धी मिळवून दिली आहे. त्याचप्रमाणे आपणही आपल्या गावाला विविध दृष्टीने समृद्ध करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

पुरस्काराचे स्वरूप
1- पहिला पुरस्कार 25 लाख रुपये रोख रक्कमेचा
2- दुसरा पुरस्कार 20 लाख रुपये रोख रक्कम
3- तिसरा पुरस्कार 10 लाख रुपये रोख रक्कम
4- चौथा पुरस्कार 05 लाख रुपये रोख रक्कम
5- पाचवा पुरस्कार 05 लाख रुपये रोख रक्कम

COMMENTS