महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी काम करा : ना. देसाई

Homeमहाराष्ट्रसातारा

महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी काम करा : ना. देसाई

सातारा जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी केल्या होत्या.

सुरक्षित दिवाळी साजरी करा… महावितरणचे आवाहन
तरुणाचा दरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न | LOK News 24
स्फोटकप्रकरणी वाझे करणार होता दोन हत्या ; एनआयएच्या तपासात उलगडले रहस्य

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने विविध विभागांचा सहभाग घेऊन चांगले रोल मॉडेल तयार करावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

महिला दक्षता समित्यांचे पुर्नरचना, महिला अत्याचार रोखने, बालकांबाबतचे अत्याचार रोखणे, याबाबत पोलीस विभागाच्यावतीने पथदर्शी प्रकल्प सातारा जिल्ह्यात राबविण्याबत येणार आहे. त्याचा आढावा आज गृह राज्यमंत्री देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला. बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी मनोज ससे आदी उपस्थित होते.


महिलांवरील व मुलींवरी अत्याचार रोखण्याबाब पथदर्शी प्रकल्प जिलह्यात राबविण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प विविध विभागांचा समावेश घेऊन चांगल्या पध्दतीने तयार करा. अधिवेशन संपात ह्या प्रकल्पाचे रॉल मॉडेल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांना दाखविण्यात येईल. हा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे दोन ते तीन महिन्यात परिणाम दिसतील. यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करा, अशा सूचना ना. देसाई यांनी बैठकीत केल्या.

COMMENTS