महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रासह संपुर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा

सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान विविध समस्यांनी ग्रासले
महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये
एसबीसी प्रवर्गाच्या साप्ताहिक आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

महाराष्ट्रासह संपुर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आली. शहरातील मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलीत करुन महिलांना सुरक्षा प्रदान करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके, भारतीय वाल्मिक संघटनेचे तालेवर गोहेर, आरपीआय आयटी सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा सरचिटनिस दया गजभिये, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष आशिष भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक जिल्हा उपाध्यक्ष आकाश बडेकर, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक जिल्हा संघटक नितीन निकाळजे, युवक जिल्हा संघटक बापू भोसले, माणस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल बेलपावर, नगर तालुका युवक सरचिटनिस निखिल सुर्यवंशी, आय टी सेल नगर तालुकाध्यक्ष तुषार धावडे, बाळासाहेब नेटके, अरविंद धीवर, बंटी साळवे, आकाश गायकवाड, मयूर भोसले, शाहरुख शेख, विक्रम चव्हाण, शोभा साळुंके, सुरेखा नेटके, नंदा राठोड, शारदा उमाप, बाबासाहेब बनसोडे, कुणाल माळवे, गणेश सोनवणे, हर्षल गायकवाड, राहुल विघावे, प्रकाश नागपुरे, पोपट नेटके आदिंसह युवक उपस्थित होते.

दिल्ली येथे महिला पोलिस कर्मचारीवर झालेला बलात्कार व हत्या, मुंबई येथील साकीनाका येथे युवतीवर झालेला अमानुष अत्याचार, उत्तरप्रदेशमध्ये अलिगड जिल्ह्यातील किसनगड गावातील 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन केलेली हत्या, बुलढाणा नांद्रा कोळी येथील बलात्कार नंतर तरुणीची आत्महत्या, डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे भिल्ल समाजाच्या महिलांना मारहाण अशा प्रकारे महिला, युवती व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसंदिवस वाढत आहे. देशात कठोर कायदे नसल्याने आरोपी न घाबरता असे कृत्य करीत आहे. महिलांवर अत्याचार करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा झाली तर इतर महिलांवर अत्याचार करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. 

महिलांना देशात व राज्यात संरक्षण देण्याचं काम शासनच आहे. आरोपींच्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवल्या जाव्यात जे ने करून महिलांना लवकरात लवकर न्याय मिळेल. आरोपींना शिक्षा होण्यास विलंब होत असेल तर आरोपी जमिनीवर येऊन पुन्हा महिलांवर अत्याचार करण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी महिला-युवतींवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुन आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यास असे प्रकार पुन्हा घडणार नसल्याचे आरपीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायद्याची घोषणा करूनही शक्ती कायदा लागू केला नाही. शक्ती कायदा लागू करून त्याची अंबलबजावणी झाल्यास महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना कमी होणार असल्याची भावना आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी व्यक्त केली. महिलांवर होणार्‍या अत्याचार विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी व महिलांना संरक्षण द्यावे. पुढील काळात असे अन्याय होत असतील. तर आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी दिला.

COMMENTS