महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप होणार

Homeमहाराष्ट्रसातारा

महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप होणार

कोयना धरण व अभयारण्याग्रस्त प्रश्‍नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या कथेची बी.ए. अभ्यासक्रमात निवड
इंडिया आघाडीमध्ये संयोजक ठरेना  
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पेटणार !

अजित पवार यांचे निर्देश : डॉ. भारत पाटणकर यांची माहिती

पाटण / प्रतिनिधी : कोयना धरण व अभयारण्याग्रस्त प्रश्‍नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याच बरोबर जमीन उपलब्ध करून त्याची आकडेवारी जाहीर करणे व गायरान जमीन शेती लायक देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्‍नाबाबत स्वतंत्र कार्यालय सुरु करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. महानिर्मिती, महावितरण, महापरेषण या कंपन्यांमध्ये नोकरीमध्ये कोयना धरणग्रस्तांना विशेष प्राधान्य घ्यावे. भावा बरोबर बहिणीला कायद्याप्रमाणे लाभ मिळण्याची कार्यवाही करावी. पाटण, जावळी, महाबळेश्‍वरमधील शेतीला पाणी देण्याचा प्रस्ताव करण्याचे सर्वेक्षण करण्यात यावे. व्याघ्र प्रकल्पच्या बाबतीत जन वन कमिटी व विकास आराखडा बाबात निधीची मागणी करण्यात यावी. नौका विहाराबाबत तात्काळ निर्णय घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या वेळी बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अदिती तटकरे व कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वतीने चैतन्य दळवी, महेश शेलार, मालोजीराव पाटणकर, सचिन कदम आदी उपस्थित होते.

COMMENTS