महाराष्ट्रातील दीड कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील दीड कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

मुंबई/प्रतिनिधी :राज्यात कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेचा धोका आणि येऊ घातलेले सणवार-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना लसीकरणाशिवाय पर्याय नाही. महा

कोपरगाव विधानसभेची निवडणूक होणार रंगतदार
पुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं
नगर शहरातील खड्ड्याला दिले मनपा आयुक्तांचे नाव : युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

मुंबई/प्रतिनिधी :राज्यात कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेचा धोका आणि येऊ घातलेले सणवार-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना लसीकरणाशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल दीड कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
राज्यातील तब्बल एक कोटी 53 लाख 78 हजार 450 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. तर शुक्रवारी (28 ऑगस्ट) एका दिवसात विक्रमी नोंद करत राज्यात सुमारे 10 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी आरोग्य यंत्रणेचे कौतुक करताना म्हटले आहे कि, आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी घेतलेले कष्ट हे निश्‍चितच प्रशंसनीय आहेत. त्याचप्रमाणे, राज्यात दर दिवशी 10 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे देखील लसीकरण केले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांच्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून हे अगदी स्पष्ट झाले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 14 ऑगस्ट रोजी 9 लाख 64 हजार 460 नागरिकांना लस देण्यात आली होती. राज्याने 21 ऑगस्ट रोजी हा विक्रम मोडून काढत 11 लाख 4 हजार 464 नागरिकांचे लसीकरण करून विक्रमी कामगिरी केली.

क्टोबर महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट?
केंद्रीय गृह विभागांतर्गत येणार्‍या राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने पंतप्रधान कार्यालयाकडे नुकताच एक अहवाल सुपूर्द केला आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे, 100 टक्के लसीकरण पूर्ण होईपर्यंत खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येकासाठीच अनिवार्य असणार आहे.

COMMENTS