महाराष्ट्राची चिंता वाढवणार्‍या दोन घटना

Homeसंपादकीयदखल

महाराष्ट्राची चिंता वाढवणार्‍या दोन घटना

कोणताही विषाणू सातत्यानं बदलत असतो. त्याच्या उत्प्रेरकात बदल होतो. कधी कधी विषाणूची पूर्वीची क्षमता कमी कमी होत जाते; परंतु कोरोना विषाणूचं तसं नाही. तो सातत्यानं नव्या रुपात पुढं येतो आहे.

नव्या घोषणांसह दिलासादायक अर्थसंकल्प!
सामान्य माणूस जिंकला..बेरकी राजकारण हरले!
ऍड. बाळासाहेब, योग्यच म्हणाले!

कोणताही विषाणू सातत्यानं बदलत असतो. त्याच्या उत्प्रेरकात बदल होतो. कधी कधी विषाणूची पूर्वीची क्षमता कमी कमी होत जाते; परंतु कोरोना विषाणूचं तसं नाही. तो सातत्यानं नव्या रुपात पुढं येतो आहे. त्याची वेगवेगळी रुपं अधिक धोकादायक होत चाललं आहे. लस आणि औषधांनाही नवे व्हेरिएंट प्रतिसाद देत नाहीत. मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे निपाहचा विषाणू आढळल्यानं आणि त्यामुुळं होणार्‍या मृत्यूचं प्रमाण 65 टक्क्यांहून अधिक आहे. 

जगात काही ठिकाणी कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. महाराष्ट्रात आता तिसरी लाट तीन-चार आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातही पहिल्या आणि दुसर्‍या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक धोकादायक असल्याचा सावधानतेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचं कारण कोरोनाच्या विषाणूंत झालेले बदल हेच आहे. उत्प्रेरित विषाणू अधिकाधिक घातक रुप धारण करीत आहेत. भारतात ब्राझील, युरोपमधून आलेल्या विषाणूंचे रुग्ण वाढायला लागले आहेत. भारतात सापडलेल्या नव्या कोरोनाचा अख्ख्या जगानं धसका घेतला आहे. त्यातही  कोरोनाच्या बाबतीत जगातील सात राष्ट्रांच्या पंक्तीत बसलेल्या महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूंच्या संख्येनं महाराष्ट्राच्या उरात अगोदरच धडकी भरलेली असताना आता आलेल्या दोन बातम्या चिंता वाढवणार्‍या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण सापडले आहेत. देशात 25 पैकी 21 रुग्ण महाराष्ट्रातील असल्यानं चिंता वाढणं स्वाभावीक आहे. देशातचील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण भोपाळमध्ये आढळला. एका 65 वर्षीय महिलेला या नव्या विषाणूची बाधा झाली होती. त्यानंतर गुजरातमध्ये डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला. आता महाराष्ट्राबरोबरच केरळमध्येही या प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. दुसरी बातमीही तितकीच चिंताजनक आहे. चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोनाची निर्मिती झाली. तिथंही वटवाघुळामुळंच कोरोना पसरल्याचं सांगितलं जातं. आता महाराष्ट्रातील वटवाघुळात निपाह नावाचा विषाणू आढळला आहे. तो कोरोनापेक्षाही घातक आहे. या विषाणूचे वटवाघूळ हे वाहक असून, या विषाणूत कोरोनाचं मूळ आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणतीही लस नाही. तसंच औषधंही उपलब्ध नाहीत. या विषाणूमुळे होणार्‍या मृत्यूचं प्रमाण कोरोनानं होणार्‍या मृत्यूच्या 65 पट अधिक आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि निपाह विषाणूनं महाराष्ट्राच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. कोरोना व्हायरसनं स्वतःला असं काही बदललं आहे, की कोरोनावरची औषधं आणि लसही प्रभाव पाडू शकेल का याबद्दल शंका घेतली जात आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मे पासून जवळजवळ सात हजारांहून अधिक नमुने घेण्यात आले. त्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रूग्ण सापडले आहेत. डेल्टा प्लस त्याच्यामधल्या स्पाईक प्रोटीनच्या मदतीनं पेशींवर आक्रमण करतो आणि हा व्हायरस रोगप्रतिकारक शक्तीवर जबरदस्त हल्ला करतो. त्यामुळंच कोरोनावरची लस डेल्टावर परिणामकारक ठरण्याबद्दल साशंकता आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटवर अँटिबॉडी कॉकटेलचाही परिणाम होत नाही.  डेल्टा व्हेरियंट सगळ्यात आधी भारतात ऑक्टोबर महिन्यात सापडला होता. भारतात दुसर्‍या लाटेचा कहर डेल्टा व्हेरियंटमुळेच झाल्याचा अंदाज आहे. सध्या इंग्लंडमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. फायझर आणि अ‍ॅस्ट्राझेन्काच्या लसी डेल्टा व्हेरियंटपासून संरक्षण देतात, असा दावा करण्यात आला. सध्या कोरोनावरच्या लसी या अल्फा व्हेरियंटसाठी बनवण्यात आल्या आहेत; पण डेल्टा व्हेरियंटला विचारात घेऊन लसी तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं डेल्टाचा धोका कायम आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोना विषाणूनं पुन्हा एकदा आपलं रूप बदललं आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं हजारो लोकांचा बळी गेला. आता कोरोनाचा नवीन ’डेल्टा प्लस’ प्रकार देशात मोठ्या वेगानं पसरत आहे. महाराष्ट्रात ’डेल्टा प्लस’ व्हेरिएंटच्या सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस प्रकारची 21 प्रकरणं समोर आली आहेत. यातील 9 प्रकरणं रत्नागिरी, 7 जळगाव, 2 मुंबई, तर  सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर  जिल्ह्यातील  प्रत्येकी एक आहेत. राज्य सरकारनं आता जीनोम सिक्वेंनिंग करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केरळमधील पलक्कड आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये एसएआरएस-सीओव्ही -2 डेल्टा-प्लस रूपांच्या किमान तीन घटना आढळल्या आहेत. कडपारा येथील चार वर्षाच्या मुलास या डेल्टा-प्लस वरुनच्या विषाणूची लागण झाली. कोरोनाचं नवीन रूप चिंता वाढवतं. अत्यंत संक्रमक डेल्टा व्हेरिएंट बी .1.617.2 जो प्रथम भारतात सापडला होता, तो डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये बदलण्याची अपेक्षा आहे. जीवघेणा निपाह विषाणू महाराष्ट्रातील दोन वटवाघुळात आढळून आला आहे. पुण्यातील ’नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या शास्त्रज्ञांना महाबळेश्‍ववर येथील गुहेतील दोन वटवाघुळात निपाह विषाणू सापडला आहे. अभ्यासातील प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांना सांगितलं, की महाराष्ट्रातील कोणत्याही वटवाघुळामध्ये यापूर्वी निपाहचा विषाणू आढळला नव्हता; पण मार्च 2020 मध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वरमध्ये सापडलेल्या दोन वटवाघुळांमध्ये हा विषाणू आढळला आहे. हा विषाणू माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. निपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो. हा विषाणू माणसांसाठी धोकादायक समजला जातो.

’एनआयए’नं यासंदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. ’एनआयए’च्या माहितीनुसार देशात आतापर्यंत निपाह विषाणूचा चारवेळा उद्रेक झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता एक ते दोन टक्के असते; पण निपाह विषाणूची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 65 ते 100 टक्के असते. त्यामुळंच या विषाणूचा धोका जास्त आहे. इबोलाचा प्रसार वटवाघळातूनच झाला होता. महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या संकटाशी लढा देत आहे. त्यातच आता निपाह विषाणूच्या बातमीनं राज्याच्या चिंतेत भर पडणार आहे. 2018 मध्ये केरळ राज्यात निपाह विषाणूचा प्रसार झाला होता. यात अनेकांना जीव गमवावा लागला. शिवाय राज्याच्या सीमा केरळमधील लोकांसाठी बंद कराव्या लागल्या होत्या. केरळमध्ये निपाह विषाणूनं आपलं भयानक रुप दाखवलं होतं. ‘डेल्टा प्लस’ या नवीन कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटच्या बातमीची चर्चा होऊ लागताच, नोएडातील अनेक सोसायट्यांमध्ये वैयक्तिकरित्या पुन्हा एकदा अंतर्गत निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या गेटेड अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये डिलिव्हरी बॉय किंवा आगंतुक येणार नाहीत. डेल्टा प्लस होण्याचा धोका टाळण्यासाठी बाहेर पडण्यावर तसंच कुणाला आत येऊ देण्यावर बंधनं घातली जात आहेत. कोरोनाचा सरासरी उत्परिवर्तन दर कमी आहे, म्हणजे तो इन्फ्लूएंझासारख्या इतर आरएनए व्हायरसच्या तुलनेत जवळपास चार पट कमी आहे, तरीही या विषाणूचा नवा व्हेरियंट त्वरित चर्चेत येतो. नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (बी1.617.2.1) डेल्टा मधील उत्परिवर्तनामुळे किंवा बी. 1.617.2 व्हेरिएंटमुळे तयार झाला आहे. एन501 वाय मधील पूर्वीच्या डेल्टा उत्परिवर्तीच्या बाजूने, डेल्टा प्लसमध्ये के 417 एनएम उत्परिवर्तन आहे. संशोधकांना वाटते, की या दोन उत्परिवर्तनांमुळे हा विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो. तसेच, कॅसिरिविमॅब आणि इमदेविमॅबसारख्या मानवनिर्मित अँटीबॉडी यापासून मुक्त होण्यास मदत करतात. जे सध्या भारतात कोरोना उपचारासाठी आणीबाणीच्या काळात वापरासाठी कार्यरत मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलची लक्षणं आहेत.

COMMENTS