महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या फुले 10001 ऊस वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या फुले 10001 ऊस वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या केंद्राने एम. एस. 13081 (फुले

सावधान…कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय…;
अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख हेक्टरवरील पिके अडचणीत
Ahmednagar : शिक्षक बँक सभा : दरवाजा बंद… विरोधक बाहेर… निषेध करत प्रतिसभा | LOK News24

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या केंद्राने एम. एस. 13081 (फुले 10001) हा ऊसाचा लवकर पक्व होणारा वाण कोएम. 0265 व एम.एस. 0602 या दोन वाणांच्या संकरातुन निर्माण केलेला आहे. परभणी येथे झालेल्या 45 व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या 29 ते 31 मे, 2017 मध्ये पार पडलेल्या बैठकीत फुले 10001 हा नवीन वाण सुरु आणि पुर्व हंगामात महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेला आहे. 

                      केंद्रीय बियाणे समितीने महाराष्ट्रात या वाणाची लागवड करण्यास दि. 2 एप्रिल 2019 (नोटिफिकेशन नं. 1498 अ) मध्ये मान्यता दिलेली आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे विकसित करुन प्रसारित केलेला हा पहिलाच ऊस वाण आहे. एम. एस. 13081 (फुले 10001) या वाणाच्या अखिल भारतीय पातळीवरील दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र (द्विपकल्पीय विभागात) या 9 राज्यातील 14 वेगवेगळ्या संशोधन केंद्रावर एम.एस. 13081 या नंबरने सन 2016-17 आणि 2017-18 या दोन वर्षात एकुन 34 चाचण्या घेण्यात आल्या. या 34 चाचण्यामध्ये (2 लागण पिके आणि 1 खोडवा) ऊस उत्पादन, साखर उत्पादन आणि साखर उतारा या बाबतीत हा वाण तुल्यवाण कोसी 671 आणि को. 86032 या वाणांपेक्षा सरस आढळुन आल्यामुळे दि.19.10.2020 रोजी लखनऊ येथे अॅानलाईन झालेल्या अखिल भारतीय समन्वीत ऊस संशोधन प्रकल्पाच्या 33 व्या द्विवार्षिक कार्यशाळेत या वाणाची दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र (द्विपकल्पीय विभागात) या 9 राज्यात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर आणि पाडेगाव येथील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.        दक्षिण भारतातील 9 राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यामध्ये एम. एस. 13081 (फुले 10001) या वाणाचे सरासरी ऊस उत्पादन 118.51 मेटन प्रति हेक्टरी मिळालेले असुन ते को. 86032 आणि कोसी 671 पे्क्षा अनुक्रमे 7.41% आणि 22.85% अधिक आढळुन आले आहे. ऊस उत्पादनाच्या बाबतीत  फुले 10001 हा वाण 34 चाचण्यांपैकी 13 चाचण्यांमध्ये पहिल्या तीन क्रमांकात आलेला आहे. या वाणाचे सरासरी साखर उत्पादन 16.84 मेटन प्रति हेक्टर मिळालेले असुन ते को. 86032 आणि कोसी 671 पे्क्षा अनुक्रमे 11.58% आणि 18.39% अधिक आढळुन आले आहे. साखर उत्पादनाच्या बाबतीत  एम. एस. 13081 हा वाण 34 चाचण्यांपैकी 19 चाचण्यांमध्ये पहिल्या तीन क्रमांकात आलेला आहे. एम. एस. 13081 या वाणातील सुक्रोजचे प्रमाण सरासरी 19.78% आढळुन आले असुन ते को. 86032 पे्क्षा 2.71% अधिक असुन कोसी 671 एवढेच आहे. या वाणामध्ये सी.सी.एस. 13.88% असुन ते को. 86032 पेक्षा 2.37% अधिक आहे. हा वाण खोडव्यासाठी उत्तम असुन खोडव्याचे ऊस उत्पादन 101.48 मेटन प्रति हेक्टर मिळालेले असुन ते को. 86032 आणि कोसी 671 पेक्षा अनुक्रमे 1.09% आणि 22.85% अधिक आढळुन आले आहे.     पूर्वहंगामात एम.एस. 13081 (फुले 10001) या वाणाचे सरासरी ऊस आणि साखर उत्पादन अनुक्रमे 151.09 मे.टन/हे. आणि 21.53 मे.टन/हेक्टर मिळालेले आहे. तथापि काही शेतकर्यांनी या जातीचे एकरी 100 मे.टन पेक्षा अधिक उत्पादन घेतलेले आहे. ही जात मध्यम ते भारी जमिनीत तसेच क्षारपड जमिनीतही चांगली वाढते. फुटव्याचे प्रमाण चांगले असल्याने खोडव्याचे उत्पादन अधिक मिळते. पाने गर्द हिरवी, रुंद, सरळ वाढणारी व पानाच्या देठावर कुस आढळुन येत नाही. पाचट सहज निघते.  खोडकिड, कांडीकिड, शेंडेकिड व लोकरी मावा या किडींना चांगली प्रतिकारक्षम आहे. ही जात मर व लालकुज रोगास मध्यम प्रतिकारक आहे. ही जात पाण्याचा ताण सहन करते.साखर कारखान्यांच्या सुरवातीच्या गळीत हंगामात अधिक साखर उतारा यासाठी हा वाण पसंतीस पडलेला आहे. महाराष्ट्रात या वाणाची 5 टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केली जात असुन नजिकच्या काळात या वाणाखालील क्षेत्र वाढणार असल्याचे पाडेगाव येथील ऊस विशेषज्ञ आणि ऊस पैदासकार यांनी सांगितले आहे.

COMMENTS