महागाईचा आलेख उंचावलेलाच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागाईचा आलेख उंचावलेलाच

महागाई वाढ थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही.

कॉपीप्रकरणी केंद्र संचालकांसह नऊ शिक्षकांवर गुन्हा
महावितरणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या | LOKNews24

 मुंबई/प्रतिनिधीः महागाई वाढ थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. मार्च महिन्याच भाजीपाल्याचे भाव आटोक्यात आले; परंतु खाद्यतेल मासे, मासांच्या वाढत्या भावाने घराचे बजेट कोलमडले.

देशातील किरकोळ महागाई निर्देशांक मार्चमध्ये 5.52 टक्क्यांवर पोहोचला.  फेब्रुवारीमध्ये तो 5.03 टक्के होता. तेल, मासे आणि मांसाचे भाव वाढल्याने सामान्यांच्या बजेटवर मोठा आघात झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत आपल्याकडे भाजीपाला स्वस्त मिळाला. अहवालानुसार खाण्यापिण्याच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. यामुळे अन्नधान्य चलनवाढीचा दरही 3.87 टक्क्यांवरून 4.94 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तथापि, या काळात भाज्यांनी सामान्य लोकांना थोडा दिलासा दिला. मार्चमध्ये भाजीपाला 4.83 टक्क्यांनी स्वस्त झाली. त्याच वेळी, इंधन आणि ऊर्जा महाग झाली आहे. त्यात 3.53 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यापर्यंत वाढ झाली. महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या सलग पाच तिमाही धोरणा रेपो दरात काहीही बदल केला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरविल्यानुसार मार्चमधील महागाई फक्त सहा टक्क्यांच्या आत आहे. सलग चौथ्यांदा महागाई रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणात आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महागाई 5.2 टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला होता. सोमवारी फेब्रुवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारीही जाहीर करण्यात आली. त्यानुसार, फेब्रुवारी आयआयपी 3.6 टक्के घसरला. जानेवारीत तो 1.6 टक्के घसरला होता. कमकुवत उत्पादनाचे मुख्य कारण म्हणजे उत्पादन क्षेत्रात सुस्तपणा. या क्षेत्रातील उत्पादन 3.7 टक्क्यांनी घटले आहे. जानेवारीत ते फक्त 2 टक्के होते. गेल्या वर्षी एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत औद्योगिक उत्पादन पाहिले तर ते 11.3 टक्के खाली आले आहे. 

औद्योगिक क्षेत्रातील खाण विभागात साडेपाच टक्के, उत्पादन क्षेत्र 3.7 टक्के, प्राथमिक वस्तूंचे क्षेत्र 5.51 टक्के, भांडवली वस्तू 2.2 टक्के, पायाभूत क्षेत्र 4.7 टक्के, मध्य वस्तू 5.6 टक्के, आणि ग्राहक नॉन-ड्युरेबल क्षेत्र 3.8 टक्के घसरले. तथापि, ग्राहक टिकाऊ वस्तूंमध्ये 6.3 टक्के वाढ झाली आहे आणि विजेचा वापर 0.1 टक्क्याने वाढला आहे. 

COMMENTS