ममतांच्या विरोधात उमेदवार दिल्यास भाजपचेच पैसे वाया जातील… तृणमूलचा इशारा

Homeताज्या बातम्यादेश

ममतांच्या विरोधात उमेदवार दिल्यास भाजपचेच पैसे वाया जातील… तृणमूलचा इशारा

वेब टीम : कोलकातापश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम विधानसभा क्षेत्रात भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी मुख

ह.भ.प. गोविंद महाराज शिरोळे यांना इंडियन पिनाकल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 
कलाकारांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलाय ‘गोदावरी’;
उसने पैसे मागितले म्हणून महिलेचा खून

वेब टीम : कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम विधानसभा क्षेत्रात भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता.

यानंतर आता, ममता बॅनर्जी ह्या भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. आपल्या या पारंपरिक जागेवर ममता विजय मिळवतील, असा दावा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला आहे.

एवढेच नाही, तर भाजपने भवानीपूरमध्ये ममतांच्या विरोधात उमेदवार उभा करू नये, अन्यथा पैशांचा उपव्यव होईल, असा इशारा तृणमूलचे नेते मदन मित्रा यांनी भाजपला दिला आहे.

ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढणार आहे, याची पुष्टी मदन मित्रा यांनी केली आहे.

तसेच, भाजपने या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून पैश्यांचा अपव्यव करू नये. ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आहे, असा सल्ला मित्रा यांनी भाजपचे नाव न घेता दिला.

दरम्यान, मुख्यमंत्रीपद कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना ही पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे आहे. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना ५ नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

COMMENTS