Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसेने घातला महाविकास आघाडी सरकार पुतळ्यास दारूचा अभिषेक

लॉकडाऊन काळात दारू दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला शुक्रवारी दारूचा अभिषेक घालण्यात आला.

नेवाश्यात अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रवरा स्कूलचे यश
अहमदनगर शहर व जिल्ह्यात आजपासून चौदा दिवस प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर/प्रतिनिधी- लॉकडाऊन काळात दारू दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला शुक्रवारी दारूचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी बोलताना, महाविकास आघाडी सरकार दारुडी असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केला. दारुवाले तुपाशी तर सर्वसामान्य व्यापारी उपाशी, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बाजारपेठ बंद असताना दुसरीकडे शहरातील दारू दुकानातून खुलेआम दारू विक्री होत आहे व सरकारने घरपोच दारू विक्रीस परवानगी दिल्याने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दारूचा अभिषेक घातला. यावेळी जिल्हा सचिव भुतारे यांच्यासह उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदी उपस्थित होते. सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला व मनसेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी बोलताना भुतारे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारने लॉकडाऊन जाहीर केले असताना सर्व व्यापार ठप्प करण्यात आले तसेच बाजारपेठ व दुकाने बंद करण्यात आले. पण महाविकास आघाडी सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले. कपड्यांचे दुकान, किराणा, मोबाईल दुकान,ऑटोमोबाईल, भाजी मार्केट या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार दोन ते तीन महिने झाले पगार नाही व त्यांना कोणतीही शासनाची मदत नसल्याने हवालदिल झाले आहेत. किराणामाल चोरून विकायचा व दारू खुलेआम विक्री करायची, असे सध्या सुरू आहे, असा दावाही त्यांनी केली. सर्वसामान्य दुकानदाराची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा चालू करण्याचे आदेश दिलेले आहे. शहरांमध्ये 10 हजार रिक्षावाले आहे, त्यापैकी फक्त 500 रिक्षावाल्यांना सरकारने मदत केलेली आहे. बँक-फायनान्स कंपनीचे हप्ते भरायला सुद्धा सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, कामगार यांच्याकडे पैसे राहिलेले नाही. त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून तसेच गर्दीचे योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी भुतारे यांनी केली.

COMMENTS