वेब टीम : काबुल फगाणिस्तानमध्ये कोणते सरकार स्थापन व्हावे यात पाकिस्तानने बरीच ढवळाढवळ केली यावरून काही तालिबानी गट नाराज आहेत. पाकिस
वेब टीम : काबुल
फगाणिस्तानमध्ये कोणते सरकार स्थापन व्हावे यात पाकिस्तानने बरीच ढवळाढवळ केली यावरून काही तालिबानी गट नाराज आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार बनवण्याचा सल्ला दिला होता. पण तो तालिबानने स्वीकारला नाही.
तालिबानचे प्रवक्ते आणि उपसूचना मंत्री जबीउल्लाह मुजाहिद यांनी ‘डेली टाइम्स’ला सांगितले की ‘पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला यामध्ये बोलण्याचा अधिकार नाही.’
पाकिस्तान सतत जगासमोर तालिबान्यांची बाजू मांडतो. मात्र, तालिबानचे सर्व गट पाकिस्तानचे समर्थक नाहीत. अधे-मध्ये याचे पुरावे मिळत असतात.
काबूलमध्ये अशीच एक घटना घडली. तालिबानींनी पाकिस्तानचा झेंडा फाडला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुर्तुझा अली शाह यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. एका उभ्या ट्रकवर पाकिस्तानचा झेंडा लावलेला असतो. तालिबानी तो झेंडा ओढून काढतात.
एकजण तो झेंडा फाडून त्याचे तुकडे करतो. एका वृत्त वाहिनीवरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
COMMENTS