मतभेद मिटविण्याचे आव्हान

Homeसंपादकीय

मतभेद मिटविण्याचे आव्हान

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या तीन राज्यांपैकी पंजाब आणि राजस्थान काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. गटबाजी आणि मतभेदाने केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही.

न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय ? 
…याचा जाब राजकीय नेत्यांना द्यावा लागेल!
राम, नेमाडे आणि समाज !

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या तीन राज्यांपैकी पंजाब आणि राजस्थान काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. गटबाजी आणि मतभेदाने केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही. सत्ता नसल्याने तिथल्या काँग्रेसमध्येही नाराजी उफाळून आली आहे. छत्तीसगडमधील मतभेदाची दरी मिटवण्यात आली आहे. तिथले सरकार आता स्थिर आहे. महाराष्ट्रातही सारे काही आलबेल नाही. गुजरातमधील काँग्रेसच्या भांडणामुळे तिथे आम आदमी पक्षाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 

    या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने आता तीन राज्यांतील मतभेद मिटविण्यासाठी एकीकडे पावले उचलल्याचे दाखविले असले, तरी दुसरीकडे सहा दिवस राजधानीत थांबूनही माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पक्षश्रेष्ठींनी भेट दिली नाही. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना खरेच पक्षातील मतभेद मिटवायचे आहेत, की नाहीत, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. काँग्रेस अजूनही घराणेशाहीतून सुटलेली नाही. मध्य प्रदेशात कमलनाथ आजारी पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना मुलाला कार्यकारी अध्यक्ष करण्याची घाई झाली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने विविध राज्यातील नाराजांची बंडे मोडीत काढण्यासाठी सामंजस्य सूत्राचा आधार घेतला आहे. ती किती उपयुक्त ठरतात, हे येणारा काळच ठरवील. सामंजस्याच्या सूत्रांवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी पक्षातील रणनीतीकारांची चर्चा अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नाराजीची दखल घेण्यासाठी लवकरच पक्षश्रेष्ठी काहीतरी तोडगा काढतील, असे सांगितले जाते. पायलट आणि सिद्धू समर्थकांना संघटना आणि सरकारमध्ये प्रतिनिधित्व देण्याची तयारी करण्यात आली होती; परंतु उत्तर प्रदेशात जितीन प्रसाद आणि हरयाणात नवीन जिंदाल यांच्या भाजप प्रवेशाने आता युवकांना किती संधी द्यावी किंवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत पक्षश्रेष्ठी आहेत. सिद्धू आणि  पायलट यांच्यासोबत दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. पंजाब आणि राजस्थानमधील गोंधळ हा सध्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींची सर्वांत मोठी राजकीय चिंता आहे आणि म्हणूनच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियंका गांधी या सामंजस्याच्या प्रयत्नांचा सातत्याने आढावा घेत आहेत. कॅप्टन सिंग यांची सोनिया गांधी यांच्यांशी संबंधित महत्त्वपूर्ण बैठक या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीस आयोजित केली जात आहे. सिद्धू यांना सरकारमध्ये सामावून घेण्याची चर्चा एकीकडे होत असताना दुसरीकडे कॅ. सिंग आणि त्यांचा काँग्रेसमधील प्रतिस्पर्धी गट खासदार प्रतापसिंह बाजवा एकत्र आले आहेत. सिद्धू यांची डोकेदुखी कुणालाच परवणारी नाही. सिद्धू यांचे सत्तेत परत येणे शक्य शक्य आहे. कॅ. सिंग मध्यममार्गाचा अवलंब करून सिद्धूला सत्तेत परत जाण्यासाठी जवळजवळ तयार आहे; परंतु राज्यात समांतर शक्ती केंद्रासाठी कोणतीही संधी देऊ इच्छित नाही आणि म्हणूनच सिद्धू यांनाही काही प्रमाणात लवचिक बनण्याची गरज आहे. गेहलोत यांची सोनिया गांधी यांच्याशी लवकरात लवकर भेट होण्याची शक्यता नाकारली जात नाही. प्रियंका गांधी स्वत: राजस्थानमधील वाद मिटविण्यासाठी पूर्णपणे सक्रिय आहेत आणि पायलट यांच्या थेट संपर्कात आहेत. केरळ काँग्रेस संघटना आणि विधिमंडळ पक्षातील मोठ्या बदलांमुळे उद्भवलेल्या असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेते रमेश चेन्निथाला यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावले आहे. मागील विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश यांना नवीन विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद ठेवले नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ते सोनिया आणि राहुल दोघांनाही भेटतील. काँग्रेसच्या राज्य घटकांमधील गोंधळाच्या दरम्यान, खैरा यांनी दोन अन्य सहकारी आमदार जगदेवसिंग कमलु आणि पीरामल सिंह यांच्यासमवेत पंजाबचे प्रभारी सरचिटणीस हरीश रावत आणि राहुल यांची भेट घेतली आणि प्रक्रियेवर चर्चा केली. आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्याची घोषणा घोषणा करण्यात आली. एकीकडे काँग्रेसचे गुजरातमध्ये खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आम आदमी पक्ष करीत असताना दुसरीकडे याच पक्षाचे सर्व आमदार काँग्रेसमध्ये घेण्याची प्रक्रिया पार पडली. काँग्रेस व आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षांना कुणाविरुद्ध लढायचे, हेच कळत नाही. खैरा यांनी राहुल यांच्याशी पंजाब विषयीची भेट अतिशय अर्थपूर्ण असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि राज्यसभेचे सदस्य प्रतापसिंह बाजवा यांच्यात विळ्या भोपळ्याचे संबंध असताना या दोन नेत्यांची दोन्ही नेत्यांमध्ये एक गुप्त बैठकही झाली असल्याची चर्चा आहे. पतियालाच्या खासदार प्रणीत कौर आणि खदूर साहिबचे खासदार जसबीरसिंग डिंपा यांनी दोन्ही नेत्यांमधील नाराजी दूर करून, त्यांना एकत्र आणण्यात मोठी भूमिका घेतली. सिद्धू यांना पक्षश्रेष्ठींची असलेली सहानुभूती विचारात घेऊन हे दोन नेते आपसांतील वैर विसरून एकत्र आले आहेत. सिद्धू ही दोघांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. एकीकडे दोन्ही गटांत मनोमिलन केले असले, तरी सिद्धू यांनी मुख्यमंत्री सिंग यांच्यासमवेत आपण सरकारमध्ये काम करू शकत नाही. त्याचवेळी सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर सतत दबाव आणत आहेत; पण मुख्यमंत्री कोणत्याही परिस्थितीत सिद्धू यांच्याकडे पक्षप्रमुखपदाची धुरा सोपवायला तयार नाहीत. दुसरीकडे, काँग्रेसमधील भांडणाच्या संदर्भात तीन सदस्यीय समितीसमोर काँग्रेसचे मंत्री, आमदार आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार केली. त्याची काळजी सिंग यांना आहे; परंतु कॅप्टन सिंग यांनी आमदार आणि मंत्री यांच्यासाठी निवासस्थानाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. आमदार आणि नेत्यांची नाराजी दूर करण्यावर त्यांचा भर आहे.

COMMENTS