नगर- प्रतिनिधी भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे.या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते म्हणून य
नगर- प्रतिनिधी
भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे.या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते म्हणून याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असे म्हटले जाते.
पितृपक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात,असा समज आहे.श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण.सर्व पिञी अमावस्येच्या दिवशी पुर्वजांचे रुण फेडण्यासाठी त्यांच्या नावाने श्राध्द(तर्पण)विधी आवश्यक आहे.
हिंदु समाज बांधवांसाठी विश्व हिंदु परिषद,मठ मंदिर समिती तर्फे लालटाकीरोड वरील खाकीदास बाबा मठ येथे बुधवार दि.६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ८ ते 10 या वेळेत सामुदायिक श्राध्द (पितरपुजन) चे आयोजन करण्यात आले आहे.
पुजेसाठी येताना तांब्या,ताम्हण,पळी, फुलपाञ,तुळसीची पाने,पुर्वजांचे फोटो,बसकर,नॅपकीन सोबत घेवून यावे.पुजेसाठी लागणारे सर्व साहित्य मठमंदिर समिती तर्फे दिले जाईल.तरी हिंदु बांधवानी या पविञ कार्यात सहभागी होऊन पुण्य मिळवावे.
असे आवाहन मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी (मठमंदिर समितीचे प्रमुख)हरिभाऊ डोळसे मो.नं 9822271807,(विश्व हिंदु परिषद जिल्हामंत्री) गजेंद्र सोनवणे मो.नं 9422727776 सचिन पाठक गुरुजी मो.नं.9511111162 यांच्याशी संपर्क साधावा.
COMMENTS