मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या… ईडीने नोंदवले ‘असे’ काही…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या… ईडीने नोंदवले ‘असे’ काही…

प्रतिनिधी : मुंबई माजी मंत्री एकनाथ खडसे भोसरी येथील जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसते, असे स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवले. य

चिमणी दिनानिमित्त मुक्तांगणच्या प्रांगणात घरटी बनविताना चिव-चिवाट
आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटातील ‘तुर कलेयां’ गाणे रिलीज.
टीम इंडियाला प्रचंड मोठा धक्का। LokNews24

प्रतिनिधी : मुंबई

माजी मंत्री एकनाथ खडसे भोसरी येथील जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसते, असे स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवले. यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदावर असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करून दिला, असेही कोर्टाने म्हटले आहे. 

त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असे कोर्टाने ठणकावून सांगितले.

खडसे आता महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपामध्ये होते, याचा उल्लेख कोर्टाने केला आहे.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. 

३१ कोटी रुपये किंमत असलेला हा भूखंड केवळ ३.७ कोटी रुपयांना विकल्याचा दावा केला गेला होता. ‘रेडी रेकनर’ दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची ही खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांचा होता. एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. 

खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. 

पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विकला!

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ६ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. 

त्यांची १३ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या. चौधरींना दोन महिन्यांनंतरही जामीन मिळालेला नाही. दरम्यान, खडसेंनाही अटक होण्याची शकत्या वर्तवण्यात येत होती.

COMMENTS