मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा करूनही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करणे टाळले होते. तसेच आगामी सण-उत्सवांचा वि
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा करूनही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करणे टाळले होते. तसेच आगामी सण-उत्सवांचा विचार करूनच निवडणूक तारीख जाहीर करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी जाहीर केले होते. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात कामाचा उरक वाढला असून, अनेक फायली क्लिअर करण्याचा सपाटा सुरू आहे. कारण दसर्यानंतर पुढील एक-दोन दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.
राज्य सरकारच्या बैठकीत निर्णयांचा धडाका सुरू असतांना दुसरीकडे मंत्रालयात देखील नव्या प्रस्तावाला मंजूरी देण्याची लगबग वाढली आहे. दिवसाला शेकडो शासन निर्णय जारी होताना पाहायला मिळत आहे. त्यासाठी आमदारांपासून मंत्र्याची चांगलीच धावाधाव सुरु झाली. आचारसंहितेच्या आधीच टेंडर काढण्यासाठी सर्वांनी तागद पणाला लावली. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना निधी मिळणारे शासन निर्णय सर्वाधिक पाहायला मिळत आहे. ऑक्टोबरच्या दुसर्या पंधरवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता ग्रहित धरून मंत्रालयातील हालचाली कमालीच्या वाढल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवे प्रस्ताव व फायलींच्या मंजुरीचा वेग कैकपटीने वाढला आहे. विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीत तर निर्णयांचा धडाका सुरू आहे. दिवसाकाठी अनेक निर्णय हातावेगळे केले जात आहेत. यासाठी आमदारांपासून मंत्र्यांची धावाधाव सुरू आहे. विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे घटनात्मक तरतुदींनुसार निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सामान्यतः 45 दिवसांच्या आत नवी विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते. त्यामुळे 13 ऑक्टोबरनंतर केव्हाही राज्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी हरियाणा व जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे लागणार आहेत. त्यानंतर 10 तारखेला या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम संपुष्टात येईल. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसर्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही. त्यामुळे 14 तारखेपासून सुरू होणार्या आठवड्यात म्हणजे ऑक्टोबरच्या दुसर्या पंधरवड्यात केव्हाही महाराष्ट्र निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो.
निवडणूक वेळेवरच होण्याचे संकेत
महाराष्ट्रात नवी विधानसभा 26 नोव्हेंबरच्या आधीच अस्तित्वात येईल तसे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले होते. त्यामुळे आणि अलीकडच्या काही निवडणुकांचा विचार करता आचारसंहितेचा कमी होणारा कालावधी लक्षात घेता दसर्यानंतर म्हणजे 12 ऑक्टोबरनंतर आचारसंहितेचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे. मात्र, निवडणूक किती टप्प्यात होईल, हे लवकरच सांगू, असे राजीव कुमार यांनी सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक वेळेवरच होण्याचे संकेत आहेत.
COMMENTS