कृष्णा कारखान्याची हाती असलेली सत्ता जावून मोठ्या फरकाने होणारा पराभव टाळण्यासाठी बड्या नेत्याना पॅकेज आणि छोट्या कार्यकर्त्यांना पाकीट देण्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी केविलवाणे प्रयत्न सुरू केले आहेत.
इस्लामपूर / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याची हाती असलेली सत्ता जावून मोठ्या फरकाने होणारा पराभव टाळण्यासाठी बड्या नेत्याना पॅकेज आणि छोट्या कार्यकर्त्यांना पाकीट देण्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी केविलवाणे प्रयत्न सुरू केले आहेत. सहकार पॅनेलच्या मागे सभासदांचा पाठिंबा नसल्याने ट्रस्टवरील कामगार आणि शिक्षण संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी घेवून त्यांना फिरावे लागत आहे. यावरून भोसले यांनी निवडणुकीपूर्वी आपली हार मानली असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत नूतन जगन्नाथ मोहिते यांनी संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लवंडमाची, बेरडमाची (ता. वाळवा) येथील सभासदांशी संवाद साधताना व्यक्त केले.
यावेळी संस्थापकचे उमेदवार बाबासाहेब पाटील (येडेमच्छिंद), मधुकर डिसले, पंडीत माळी, अविनाश पाटील, उत्तम डिसले, महादेव डिसले, राहुल निकम, तानाजी यादव, जयवंतराव मोरे, प्रकाश साळुंखे उपस्थित होते.
मोहिते म्हणाल्या, कारखान्याचे खासगीकरण करण्यासाठी ज्या दिवशी ऊस उत्पादक सभासदांना अक्रियाशीलतेच्या नोटिसा काढल्या. त्याच दिवशी भोसले यांना सत्तेतून दूर करण्याचा सभासदांनी निश्चय केला आहे. आता निवडणूक ही केवळ औपचारिकता राहिली आहे.
अविनाश मोहिते यांनी त्यांच्या काळात सभासदासाठी सुरू केलेल्या आरोग्यविषयक योजना भोसले यांनी बंद पाडल्या. कृषी प्रदर्शन बंद केले. यावरून भोसले यांची सभासदाप्रती असलेली दुष्ट भावना दिसून येते. माझ्या मुलास त्यांनी कपटाने राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारखान्याचे सभासद सुज्ञ असून ते 29 जून रोजी संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करून भोसले परिवाराची सरंजामशाही कायमस्वरूपी संपुष्टात आणतील, असा विश्वास मोहिते यांनी व्यक्त केला.
डॉ. इंद्रजित मोहिते हे सहकाराच्या नावाखाली स्वाहाकाराची वृत्ती अंगी बाळगणारे संधीसाधू भ्रमिष्ट नेते आहेत. त्यांनी बड्या धेंडाना अभय दिल्याने आणि छोट्या कर्जदाराकडून पठाणी पध्दतीची वसुली अवलंबल्यामुळे यशवंतराव मोहिते पतसंस्था बुडाली. छोट्या कर्जदारांनी कर्जाच्या दसपट वसुलीच्या नोटीस आल्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारला होता असे सांगून डॉ. मोहिते यांना यशवंतराव मोहिते पतसंस्था आणि यशवंत बझारमधील अपहार दडविण्यासाठी कारखाना हवा आहे तर
डॉ. भोसले यांना खासगीकरण करण्यासाठी कारखाना हवा असल्याचा आरोपही मोहिते यांनी यावेळी केला.
COMMENTS