भिमनगरमधील 200 बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड,अत्यावश्यक आणि सुरक्षा किटचे वाटप!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिमनगरमधील 200 बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड,अत्यावश्यक आणि सुरक्षा किटचे वाटप!

प्रतिनिधी : गडहिंग्लज  गडहिंग्लज शहरातील प्रभाग क्र. 2 मधील भिमनगर परिसरातील बांधकाम कामगारांना ( पेंटर ) स्मार्ट कार्ड ,अत्यावश्यक व सुरक्षा

मनपाच्या प्रस्तावित तिप्पट घरपट्टीला कामगार संघटनेनेही केला विरोध
मुंबईत लवकरत ब्लास्ट करणार, मुंबई पोलिसांना ट्वीटरवरुन धमकी
गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप

प्रतिनिधी : गडहिंग्लज 

गडहिंग्लज शहरातील प्रभाग क्र. 2 मधील भिमनगर परिसरातील बांधकाम कामगारांना ( पेंटर ) स्मार्ट कार्ड ,अत्यावश्यक व सुरक्षा किटचे वाटप व पालिकेतील सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार तसेच कोरोना काळात काम केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कोवीड योदधा पुरस्कार देऊन सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम , उदयराव जोशी नगरसेवक हारूण सय्यद , सुरेश कोळकी , नगरसेविका रेश्माताई कांबळे , महिला शहराध्यक्षा शर्मिला मालंडकर , गुंडु पाटील , उदय परिट , अमर मांगले , रश्मीराज देसाई , महेश गाडवी ,सुनिता नाईक , राजू जमादार,पटेल सर,राहूल शिरकोळे यांची प्रमुख उपस्थिति होती. यावेळी उदय जोशी , सुरेश कोळकी , रेश्माताई कांबळे यांची मनोगते झाली.

किरणअण्णा कदम म्हणाले , आमचे नेते नामादार.मुश्रीफ साहेब व शहरातील प्रमुखांनी महेश सलवादे याला पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहे. गतवर्षी उपजिल्हा रूग्णालयाच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली तेव्हापासुन गोरगरीब जनतेच्या आरोग्याची कामे , कोवीड काळात रुग्णासाठी केलेली मदत कौतुकासपद आहे . राष्ट्रवादीने भिमनगरामध्ये इतकी कामे केली आहे की विरोधक शिल्लक राहणार नाही आणि हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असाच टिकून राहणार यात शंका नाही . गेल्या काही वर्षात महेशने केलेल्या कामाचा आलेख पाहाता येत्या निवडणुकित हा चेहरा नगरपालिकेच्या सभागृहात दिसायलाच हवा आणि यासाठी भिमनगरवासियांनी त्याला बळ दिलं पाहिजे असे आवाहन किरणअण्णा कदम यांनी केले .

हारुण सय्यद म्हणाले , आज पर्यत उपजिल्हा रुग्णालयाचे अनेक सदस्य पाहिले मात्र कोणाचे नावसुद्धा आठवत नाही पण जेंव्हापासून महेशची नेमणूक या पदी झाली तेंव्हापासून या पदाचा वापर जनतेसाठी करता येतो हे महेशने अत्यंत प्रभाविपणे दाखवून दिले आहे . तो या पदाला शंभर टक्के न्याय देत आहे यासाठी मी त्याचे प्रथम अभिनंदन करतो.त्याची आज्जि देवदासी चळवळीच्या नेत्या श्रीमती.गौराबाई सलवादे यांनी केलेल्या सामाजीक कार्याची पूण्याई म्हणुन महेश सलवादे राष्ट्रवादी पक्षात आले व एक तरूण चेहरा पक्षाला मिळाला .

महेश सलवादे म्हणाले , आमच्या भागातील एकही कामगार या योजनेपासून वंचीत राहणार नाही  याची काळजी घेऊ.आम्ही प्रत्येक कामगाराच्या घरी जावून ही योजना त्यांच्या घरापर्यंत पोहचवली व या योजनेतुन शैक्षणिक आर्थिक व आरोग्य विषयीच्या सर्व योजना प्रत्येक कामगारा पर्यंत पोहचवण्याचे अभिवचन आज मी यनिमित्याने देतो. यापुर्वी हे खाते दुर्लक्षीत होते मात्र मुश्रीफ साहेबांनी ही धुरा सांभाळता या खात्यात बदल करून नवीन योजना आणून सर्वसामन्य कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे . नगरपालिकेत सफाई कर्मचारी हे आपल्याच भागातील असून त्यांचासाठी कोणतीही कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचली नाही मात्र येत्या काळात आम्ही त्यांच्या पाठीशी पुर्णपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली .*

यावेळी बाबूराव शिंगे , सर्जेराव कांबळे , सदाशिव बारामती , एल .एस.कांबळे , अनिल सावरे , राजू अनावरे ,सुनिल सुळकुडे , रविंद्र कांबळे,अशोक बारामती इत्यादी उपस्थित तर संतोष सलवादे, सुशील आसोदे ,सागर सलवादे ,चेतन खातेदार , प्रशांत सलवादे ,बबलू हुल्ले ,बबलू गुडस, आनंद गुंठे आकाश सावंत , शिवानंद सलवादे ओमकार सावंत , पृथ्वीराज बारामती , इत्यादींनी नियोजन केले.या कार्यक्रमाचे आभार सुनिता नाईक यांनी मानले.

COMMENTS