भावना गवळी यांना ईडीची दुसर्‍यांदा नोटीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भावना गवळी यांना ईडीची दुसर्‍यांदा नोटीस

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कारवाईचा फास आवळला असून, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी

गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणारा अटकेत
नेर तलावात 22 टक्के पाणीसाठा; लोकप्रतिनिधींचे लक्ष्य मंत्री पदाकडे
…तर, अंधेरी पोटनिवडणूक होणार बिनविरोध

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कारवाईचा फास आवळला असून, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने दुसर्‍यांदा नोटीस पाठवत 20 ऑक्टोबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहेत, त्यामुळे गवळी यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
भावना गवळी या यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार आहेत. गेल्या सलग पाच लोकसभा निवडणुकांपासून त्या निवडणुका जिंकत आहेत. 1999 साली भावना गवळी पहिल्यांदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यानंतर 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्येही त्या खासदार झाल्या. तत्पूर्वी, 28 सप्टेंबर रोजी ईडीने एक मोठी कारवाई करत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक आणि त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना 1 ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवले होते. सईद खान यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) नियमांतर्गत अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर सईद खान यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर, न्यायालयाने त्यांना या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवले होते.

COMMENTS