भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर बॉलिवूडवाल्यांची हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याची हिंमत होणार नाही ! – शरद पोंक्षे

Homeताज्या बातम्याराजकारण

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर बॉलिवूडवाल्यांची हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याची हिंमत होणार नाही ! – शरद पोंक्षे

वेब टीम : मुंबई     या देशाची फाळणी धर्माच्या नावावर झाल्यावर मुसलमानांना पाकिस्तान हे 'इस्लामी राष्ट्र' म्हणून मिळाले; मात्र

नवाब मलिक आमच्यासोबत नाही
मोनिकाताई राजळे आमची बहिण – प्रतापकाका ढाकणे
कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर एकाच रात्रीतुन ६ वाहने पलटी

वेब टीम : मुंबई

    या देशाची फाळणी धर्माच्या नावावर झाल्यावर मुसलमानांना पाकिस्तान हे ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून मिळाले; मात्र काँग्रेसच्या गलीच्छ राजकारणामुळे भारत हा हिंदूंना न मिळता ‘सेक्युलर’ देश झाला. याचे अनेक दूरगामी परिणाम झाले. यातील एक म्हणजे बॉलीवूडमधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करत आहेत. हिंदु धर्माच्या विरोधात बोलत आहेत. ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी या लोकांची हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याची हिंमत होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. तसे हिंदूंनी केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘बॉलीवूडचा हिंदूद्वेष !’, या ‘ऑनलाईन परिसंवादा’त ते बोलत होते.

‘सेन्सॉर बोर्ड’च्या कारभाराची पोलखोल करतांना ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’चे माजी सदस्य श्री. सतीश कल्याणकर म्हणाले की, चित्रपटांतून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होत असल्यामुळे सेन्सॉर बोर्डची मोठी जबाबदारी आहे. कोणत्याही धर्माला लक्ष्य करणारी दृष्ये नसावी, म्हणून कायद्यात सर्व प्रकारची कलमे आहेत. ‘पी.के.’ चित्रपटाच्या वेळी आक्षेपार्ह दृष्ये न वगळण्यास समाजात अशांतता निर्माण होईल, असे मी लेखी दिले होते. तरीही ती दृष्ये वगळली नाहीत. नंतर चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मला तमिळ भाषा येत नसतांनाही एक तमिळी चित्रपट ‘सेन्सॉर’ करण्याचा आग्रह ‘सेन्सॉर बोर्डा’च्या अधिकार्‍यांनी केला. मी नकार दिल्यावर त्यांनी ‘केवळ दृष्ये (सीन) पाहून सेन्सॉर करा’, असे सांगितले. एकूणच सेन्सॉर बोर्डला हास्यास्पद बनवून ठेवलेले आहे. कशीही मंजूरी मिळत असल्यामुळे निर्मार्त्यांकडून नियम न पाळता कोणत्याही प्रकारचे चित्रपट बनवले जात आहेत. खरे तर सेन्सॉर बोर्डाला प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

    ‘हिंदू आय.टी. सेल’चे श्री. रमेश सोलंकी म्हणाले की, बॉलीवूडमध्ये सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट-मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे. ‘रावण-लीला’ चित्रपट आणि ‘कन्यादान’सारख्या जाहिराती करणार्‍यांनी अन्य पंथांच्या हलाला, कन्फेशन पद्धतीतून होणार्‍या बलात्कारांवर चित्रपट का काढत नाहीत ?

    या वेळी ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट म्हणाले की, गदर चित्रपटातील अभिनेत्रीचे ‘सकिना’ आणि दुसर्‍या चित्रपटात जॉली लिव्हरचे ‘अब्दुल्ला’ हे नाव आक्षेप घेतल्यावर लगेच पूर्णपणे वगळले जाते; तशी हिंदूंच्या धार्मिक भावनांची दखल सेन्सॉर बोर्ड का घेत नाही ? सेन्सॉर बोर्डवर एका धार्मिक प्रतिनिधी नियुक्त करायला हवा, अशी आमची जुनी मागणी आहे; आज केवळ ‘रावण-लीला’सारखे चित्रपटच नव्हे, तर मराठी-हिंदी भाषेतील 48 हून अधिक मालिकांतून हिंदु धर्म, संस्कृती, कुटुंबव्यवस्थेवर आघात केले जात आहेत. अशा निर्मात्यांना कारागृहात टाकायला हवे. तरच इतरांना वचक बसेल. 

COMMENTS