नवी दिल्ली : व्यावसायिक बँकां आणि वित्तीय संस्थाद्वारे फसवणुकीचे वर्गीकरण आणि अहवाल न दिल्याबद्दल भारती स्टेट बँकेला (एसबीआय) एक कोटी रुपयांचा दंड ठो
नवी दिल्ली : व्यावसायिक बँकां आणि वित्तीय संस्थाद्वारे फसवणुकीचे वर्गीकरण आणि अहवाल न दिल्याबद्दल भारती स्टेट बँकेला (एसबीआय) एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल एसबीआयवर ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या कलम 46 (4) (आय) आणि 51 (1) सह कलम 47 ए (1) (सी) च्या तरतुदीनुसार हा दंड ठोठावलाय. नियमांच्या उल्लंघनावर आधारित ही कारवाई आहे. यामध्ये बँकेने त्याच्या ग्राहकांसह केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता स्पष्ट करण्याचा हेतू नाही. एसबीआयकडे ठेवलेल्या ग्राहक खात्याची छाननी करण्यात आली होती आणि छाननी अहवालाची तपासणी आणि त्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहार, उघडकीस आलेल्या इतर गोष्टींबरोबरच निर्देशांचे पालन न करणे तसेच या खात्यातील फसवणुकीची माहिती आरबीआयला देण्यास विलंब केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. यासंदर्भात, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये वरील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल त्यावर दंड का आकारला जाऊ नये ? तसेच याचे कारण काय ? अशी विचारणाही करण्यात आली होती. यानंतर वैयक्तिक सुनावणी, नोटीस आणि बँकेने दिलेल्या तोंडी उत्तराचा विचार करुन रिझर्व्ह बँके हा दंड ठोठावला आहे.
COMMENTS