अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील लुंबिनी उपवन बुद्धविहार येथे जिल्ह्याचे आयुष्यमान अनिकराव गांगुर्डे (महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव), आयुष्यमान सुगंधराव इंगळे (जिल्हाध्यक्ष) , अशोक बोराडे (सचिव) यांच्या उपस्थित कोपरगाव तालुका अध्यक्षपदी बौद्धाचार्य विश्वास जमधडे व सरचिटणीस पदी नानासाहेब जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.
कोपरगाव शहर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील लुंबिनी उपवन बुद्धविहार येथे जिल्ह्याचे आयुष्यमान अनिकराव गांगुर्डे (महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव), आयुष्यमान सुगंधराव इंगळे (जिल्हाध्यक्ष) , अशोक बोराडे (सचिव) यांच्या उपस्थित कोपरगाव तालुका अध्यक्षपदी बौद्धाचार्य विश्वास जमधडे व सरचिटणीस पदी नानासाहेब जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मनोहर शिंगाडे गुरुजी (वरिष्ठ केंद्रीय शिक्षक) , सावंत साहेब (पर्यटन प्रमुख), सी. एस .बनकर( सरचिटणीस), बोरले साहेब, जिने साहेब, आढाव साहेब, लोखंडे गुरुजी( केंद्रीय शिक्षक), पगारे गुरुजी, मस्के गुरुजी, हिरवाळे साहेब, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोपरगाव कार्यकारिणी नवनिर्वाचित सदस्या मध्ये संजय भडांगे (उपाध्यक्ष), योगायोग घेगडमल( पर्यटन), विकास खाजेकर (उपाध्यक्ष), मायादेवी खरे (कोपरगाव शहराध्यक्ष), बाळासाहेब सोनपसारे ( संघटक), किरण मेहेरखांब, दीपक जाधव सर, संदीप शिंदे (सचिव) आदींची कोपरगाव तालुका कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष विश्वास जमधडे यानीब बोलताना सांगितले की, जिल्हा कार्यकारणीने आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. तसेच कोपरगाव तालुक्यात वाड्या वस्त्यावर, खेड्यापाड्यात जाऊन धम्म चळवळ घराघरात पोहोचवण्याचे काम आमची सर्व कार्यकारणी करेल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष व सरचिटणीस यांचा उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
COMMENTS