भारताच्या लसीकरण मोहिमेने पार केला 32 कोटी मात्रांचा टप्पा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारताच्या लसीकरण मोहिमेने पार केला 32 कोटी मात्रांचा टप्पा

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, लसीच्या एकूण 32 कोटींहून अधिक मात्रा देऊन भारताने एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे.

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी ः सुस्मिता विखे
गोदावरी अभ्यास गटाने चार आठवड्यात अहवाल तयार करावा उच्च न्यायालयाचे आदेश : आ. आशुतोष काळे
बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, लसीच्या एकूण 32 कोटींहून अधिक मात्रा देऊन भारताने एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या माहितीनुसार, 42,79,210 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून लसीच्या एकूण 32,17,60,077 मात्रा देण्यात आल्या आहेत. 

गेल्या 24 तासात लसीच्या 64,25,893 मात्रा देण्यात आल्या. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून पासून सुरुवात झाली. देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. भारतात गेल्या 24 तासात 50,040 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सलग 20 व्या दिवशी दैनंदिन नव्या कोविड रुग्णांची संख्या 1 लाखाच्या खाली नोंदविण्यात आली. केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. 

भारतात सक्रिय रुग्ण संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या 5,86,403 आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 9,162 रुग्णांची निव्वळ घट झाली असून देशात नोंद झालेल्या एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण आता केवळ 1.94% आहे. बहुतांश लोक कोविड -19 संसर्गातून बरे होत आहेत, भारतात सलग 45 दिवस दैनंदिन नवीन कोरोना रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.गेल्या 24 तासात 57,944 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात नोंदविण्यात आलेल्या दैनंदिन रुग्ण संख्येच्या तुलनेत सुमारे 8 हजार (7,904) अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महामारीच्या सुरूवातीपासूनच संक्रमित लोकांपैकी, 2,92,51,029 जण यापूर्वीच कोविड–19 मधून बरे झाले आहेत.आणि गेल्या 24 तासात 57,944 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 96.75% असून हे प्रमाण सतत वाढीचा कल दर्शवत आहेत. संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 17,77,309 चाचण्या करण्यात आल्या.भारतात आतापर्यंत एकूण 40.42 कोटी (40,42,65,101) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे साप्ताहिक रुग्णसंख्येत सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.91% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.82% असून गेले सलग 20 दिवस हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे.

COMMENTS