भारताच्या लव्हलिनाला बॉक्सिंगमध्ये कांस्य

Homeताज्या बातम्यादेश

भारताच्या लव्हलिनाला बॉक्सिंगमध्ये कांस्य

टोक्यो : मीराबाई चानु, पी.व्ही. सिंधूनंतर आता आसमच्या लव्हलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भार

’महाराष्ट्र केसरी’ची नवी ओळख महिला कुस्तीगिरांना मिळावी : दिपाली सय्यद
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले
बांगलादेशने रावळपिंडीत इतिहास रचला

टोक्यो : मीराबाई चानु, पी.व्ही. सिंधूनंतर आता आसमच्या लव्हलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या 69 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेर्‍यांमध्ये 0-5 ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.
आसामच्या 23 वर्षीय लव्हलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला 3-2 असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला 4-1 अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते. लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्‍वविजेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेर्‍या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी 2008 मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकले होते. तर 2012 लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरले होते. विशेष म्हणजे लव्हलिनाने पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळताना पदक खिशात घातले आहे.लव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत. लव्हलिना बोर्गोहाइन उपांत्य फेरीत विश्‍वविजेत्या टर्कीच्या बुसेनाझ सुर्मीनेली विरुद्ध हरली आहे. लव्हलिनाचा 0-5 ने पराभव झाला. लव्हलिना तिन्ही फेर्‍यांमध्ये 0-5 ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाचा टोक्यो ऑलिम्पिकमधला प्रवास कांस्यपदकासह समाप्त झाला आहे.

रवी कुमारचे रौप्यपदक पक्क सुवर्णपदकांची संधी
भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्‍चित झाले असून, फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव त्याने केला आहे. त्यामुळे भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकमधले चौथं पदक निश्‍चित झाले आहे. सुरुवातीला 5-9 अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारने तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश झाला असून, त्याला आता सुवर्णपदक पटकावण्याची संधी आहे.

COMMENTS