भाजपचे उत्तर प्रदेशात मिशन तीनशे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे उत्तर प्रदेशात मिशन तीनशे

गेल्या काही काळापासून उत्तर प्रदेश दोन कारणांसाठी चर्चेत आहे. एक कोरोना काळात गंगेच्या पाण्यातून वाहत गेलेले मृतदेह आणि दुसरं भाजपातला अंतर्गत कलह.

मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
केसरी वाड्यात गणपतीचे महिन्याभरापूर्वीच आगमन
अखेर १७ व्या दिवशी मनोज जरांगेनी उपोषण घेतले मागे

लखनऊ: गेल्या काही काळापासून उत्तर प्रदेश दोन कारणांसाठी चर्चेत आहे. एक कोरोना काळात गंगेच्या पाण्यातून वाहत गेलेले मृतदेह आणि दुसरं भाजपातला अंतर्गत कलह. या दोन्हीमुळे भाजपच्या  देशभरातल्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी 300 जागांचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या घरी गेले. त्यातून भाजपच्या अंतर्गत सर्व काही आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. 

उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा कोण असेल, या एका प्रश्‍नावरून भाजपात वाद सुरू आहेत. योगी आदित्यनाथ यांना पक्षातल्याच एका गटाने विरोध सुरू केला. त्यात उपमुख्ममंत्री असलेले केशव प्रसाद मौर्य म्हणाले, की पक्ष नेतृत्व ते निश्‍चित करेन. त्यांच्या या वक्तव्यावरची शाई वाळत नाही, तोच तोच स्वामी प्रसाद मौर्य यांनीही तीच भूमिका मांडली. त्यातून योगींच्या चेहर्‍याला विरोध असल्याचे दिसून आले. कोरोना काळात गंगेतून मृतदेह वाहून जात असल्याचे जगाने पाहिले. त्यातून भाजपची प्रतिमा मलिन झाली. त्याचाच फायदा योगींच्या पक्षांतर्गत विरोधकांनी उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तर प्रदेश भाजपत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसताच काही बदल करता येतो, का यासाठीही पक्ष नेतृत्वाने प्रयत्न केले. त्यात मग उत्तर प्रदेशचे विभाजन करुन पूर्वांचलची निर्मिती असो की, पीएमओतल्या मोदींच्या विश्‍वासातल्या एका अधिकार्‍याला रिटायरमेंटनंतर मंत्री बनवण्याचा प्लॅन; योगी आदित्यनाथ दिल्लीत आधी अमित शाहांना भेटले, नंतर मोदींना. या सगळ्या बैठकांमध्ये योगी हे स्वत:च्या भूमिकेवर अडून बसले. अशी चर्चा आहे, की मोदींनी सुचवलेला मंत्रिमंडळ विस्तार, त्यात मोदींच्या खास माणसाची लागणारी वर्णी योगी आदित्यनाथ यांनी धुडकावली. शेवटी दिल्ली ते लखनऊ भाजप नेते, संघ नेते, आमदार, पक्ष संघटनेतले पदाधिकारी यांच्यात बैठकांचे सत्र सुरू झाले. कुणाचा कितीही विरोध असो; पण उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ हाच पक्षाचा सर्वांत मोठा चेहरा आहे हे मोदी-शाह यांनाही कबुल असल्याचे दिसून आले आहे. एवढेच काय या दोन नेत्यानंतर देशातील पक्षाचे तिसर्‍या नंबरचा चेहरा म्हणूनही योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे पक्षांतर्गत वाद फार न ताणता सर्व नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याचे निश्‍चित केल्याची माहिती आहे.

सारे आलबेल दाखविण्याचा प्रयत्न

राजनाथ सिंह यांनीही योगी आदित्यनाथ हेच चेहरा असतील अशी घोषणाही केली आहे. त्यानंतर काल योगी आदित्यनाथ हे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नवविवाहित मुलाला आशीर्वाद देण्यासाठी मौर्यंच्या घरी गेले. तिथच संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेही होते. दुसरे उपमुख्ममंत्री दिनेश शर्माही हजर होते. यातून पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.

COMMENTS