भाजपचा लाजिरवाणा पराभव… ममता बॅनर्जी ५९ हजार मतांनी विजयी

Homeताज्या बातम्यादेश

भाजपचा लाजिरवाणा पराभव… ममता बॅनर्जी ५९ हजार मतांनी विजयी

वेब टीम : कोलकाता पश्चिम बंगालमध्ये विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पोटनिवडणुकीत

विरोधाभास की उतरती कळा
सत्ताधारी ओबीसी नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार l पहा LokNews24
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना नंदुरबार शहरातील युवकाकडून  विरोध 

वेब टीम : कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पोटनिवडणुकीत विक्रमी मताने विजय मिळवला आहे. 

भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांना जवळपास ५८ हजार ८३२ मतांनी ममता बॅनर्जी यांनी पराभूत केले आहे. ममता बॅनर्जीच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोषाला सुरुवातही केली आहे. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी यांचं वजन वाढणार हे निश्चित झाले आहे. आता त्यांचे लक्ष्य २०१४ च्या लोकसभा निवडणुकीकडे असणार आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या विजयाचं स्वागत केले आहे. गोव्यासारख्या राज्यातही आता तृणमूल काँग्रेसनं विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

गोव्यासह अन्य राज्यांतही तृणमूल काँग्रेसनं आपली राजकीय ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. तसंच विरोधकांची मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे. 

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करताना ‘ममता दीदी जी की जीत है वही तो सत्यमेव जयते की रीत है’ असं म्हटलं आहे. 

त्यामुळे पुढील काळात भाजपविरोधात पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला तर संयोजक म्हणून ममता बॅनर्जीयांना संधी दिली जाऊ शकते. 

त्याचबरोबर विरोधकांचे नेतृत्त्वही करु शकतील. महत्वाची बाब म्हणजे याबाबत तृणमूल काँग्रेसनं यापूर्वीच जाहीर केलं आहे की ममता बॅनर्जी देशाला मार्ग दाखवतील. 

अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेस शांत बसली असेल तर टीएमसी बसून राहणार नाही, असं वक्तव्य करून तृणमूल काँग्रेसने आपली पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

COMMENTS