भागचंद ठोळे विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भागचंद ठोळे विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

कोपरगाव प्रतिनिधी -भागचंद ठोळे स्कूल मध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून आषाढी एकादशी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . विद्यालयाच्या प्रांगणात पालखी सोह

कुकडी आवर्तनासंदर्भात नीलेश लंके यांनी वेधले लक्ष
जिल्ह्यातील 1 कोटी 7 लक्ष दस्तऐवजांचे संगणकीकरण
डॉ.जयश्री थोरात यांची युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड

कोपरगाव प्रतिनिधी -भागचंद ठोळे स्कूल मध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून आषाढी एकादशी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . विद्यालयाच्या प्रांगणात पालखी सोहळा काढण्यात आला . ऑनलाईन शिक्षणाच्या काळात विदयार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राचे तसेच भारतीय संस्कृतीचा विसर पडू नये म्हणून शाळा विविध उपक्रम राबवत असते . आषाढी एकादशी निमित्त शाळेत विठ्ठल रूक्मिणीचे पूजन करून शिक्षकांनी भजने म्हटली भक्तिमय वातावरणात हा अनोखा कार्यक्रम पार पडला . यासाठी शाळेचे विश्वस्त कैलासचंद ठोळे ,  चंद्रकांत ठोळे ,दिलीप अजमेरे यांनी सर्व विदयार्थ्याना व शिक्षकवृंदाना शुभेच्छा देऊन या कोरोनाच्या संकटातून सर्वांना सुखरूप सुटका व्हावी अशी आशा व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .अर्चना वाणी , सौ . निकिता पहाडे यांनी केले .

COMMENTS