बोठेला मदत करणार्‍या महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठेला मदत करणार्‍या महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड पत्रकार बाळ ज. बोठे याला फरार काळात मदत करणारी हैदराबाद येथील

काष्टीत 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पिस्तुल चोरी
निलंबनातून शिक्षकांची हानी मात्र प्रशासनाची चांदी
नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 44 कोटी रुपये

अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड पत्रकार बाळ ज. बोठे याला फरार काळात मदत करणारी हैदराबाद येथील वकील महिला पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला.
जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली.

या हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर आरोपी बोठे फरार झाला होता. तोे फरार असताना हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात लपला होता. त्याला तब्बल 102 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. संबंधित महिलाही यात आरोपी असून, ती फरार आहे. तिने येथील न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयामध्ये दोन दिवस सुनावणी झाली, सरकारी पक्षाच्यावतीने या अटकपूर्व जामीन अर्जाला आक्षेप घेण्यात आला. खुनाचा गुन्हा अतिशय गंभीर आहे, यामध्ये एका महिलेचा खून झालेला आहे, आत्तापर्यंतच्या तपासामध्ये आरोपींना ज्यांनी-ज्यांनी मदत केली आहे, त्यामध्ये या महिलेचा समावेश आहे. त्याचे पुरावेसुद्धा पोलिसांच्या हाती लागलेले आहे. संबंंधित महिला ही बोठेशी नियमित संपर्कात होती तसेच बोठेशी ओळख नसल्याचे ती सांगत असेल तर तिने बोठेला फोन करण्याचे कारण काय, बोठेचा फोन नंबर तिला कसा काय मिळाला, असे सवाल सरकार पक्षाने उपस्थित केले व यामुळे तिला जामीन देऊ नये असा युक्तिवाद न्यायालयात केला तर आरोपी महिलेवतीने न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला की, मी जबाबदार स्त्री असून, हायकोर्ट व तेलंगना जिल्हा न्यायालयात वकिली करते, बोठेशी माझा काही संबंध नाही, त्याच्याशी यापूर्वीची कोणतीही ओळख नाही, मला या गुन्ह्यात खोटे गोवण्यात आले आहे, या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद तिच्याकडून करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर या महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या युक्तिवादाच्यावेळी सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी बाजू मांडली तर त्यांना अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी त्यांना मदत केली. आरोपी सुब्बाचारी हिच्यावतीने अ‍ॅड. पवार यांनी बाजू मांडली.

तिला आता पकडावे लागणार
फरार असतानाच्या काळात बोठे हैदराबादला असताना त्याला फरार राहण्यास मदत केल्याचा आरोप संबंधित महिलेवर आहे. हैदराबादला पोलिसांनी बोठेला पकडल्यावर तेथील अन्य तिघांनाही ताब्यात घेतले होते. या महिलेला पकडण्यात मात्र यश़ आले नव्हते. त्यानंतर तिने आता अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो आता फेटाळल्याने जरे हत्या प्रकरणातील आरोपी बोठेला मदत केल्याप्रकरणी या महिलेला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.

COMMENTS