बोठेला आज पुन्हा न्यायालयात नेणार ; केवळ एक दिवसाची पोलिस कोठडी, पोलिसांकडून चौकशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठेला आज पुन्हा न्यायालयात नेणार ; केवळ एक दिवसाची पोलिस कोठडी, पोलिसांकडून चौकशी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडाच्या गुन्ह्यातून कोतवाली पोलिसात दाखल असलेल्या विनयभंग गुन्ह्यात वर्ग करण्यात आलेला सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज.

आदिवासी समाजाने आपले हक्क जाणून घ्यावे
विकासासाठी आम्ही कोणाबरोबरही जाऊ शकतो ; खा. डॉ. विखेंची स्पष्ट भूमिका
हिंद सेवा मंडळावर आले चार नवे चेहरे

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडाच्या गुन्ह्यातून कोतवाली पोलिसात दाखल असलेल्या विनयभंग गुन्ह्यात वर्ग करण्यात आलेला सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे त्याला शनिवारी (27 मार्च) पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या या प्रकरणातील पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात गुरुवारी (दि.25) वर्ग करण्यात आले. 

कोतवाली पोलिसांनी संशयित आरोपी बोठे याला अटक केल्यानंतर शुक्रवारी (दि.26) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. बोठे याच्याकडून पोलिसांना अधिक माहिती घ्यायची आहे तसेच या गुन्ह्याच्या दृष्टीनेसुद्धा काही तपास करायचे आहेत. त्यामुळे त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकारी तथा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केली; मात्र न्यायालयाने बोठेला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. बाळ बोठे याला खुनाच्या गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर व तेथील पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला कोतवालीच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केले होते तसेच त्याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे पोलिस कशा पद्धतीने तपास करतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जरे हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत असताना बोठेने दिलेल्या माहितीची खातरजमा पोलिसांकडून केली जाणार आहे. बोठेने काहींची नावे घेतली असल्याने या सर्वांना चौकशीसाठी पोलिसांकडून बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात या विषयाची चर्चा असून, बोठेने कोणाची नावे घेतली व पोलिस कोणाला चौकशीला बोलावणार आहेत, याची उत्सुकता लागली आहे. अनेकांचे धाबे दणाणले आहेत. बोठे याने ही नावे सांगताना या मंडळींनी त्याला आश्रय् दिल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिस चौकशीत तसे निष्पन्न झाले तर त्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई पोलिस करणार आहेत. पारनेरच्या गुन्ह्यात त्याला 13 दिवसांची पोलिस कोठडी देण्यत आली होती. त्या वेळी पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने बरीच माहिती दिली आहे. त्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. 

स्टेशनवरचे फुटेज मागवले

जरे यांच्या हत्येनंतर 3 ते 10 डिसेंबर या कालावधीत बोठे नगरच्या रेल्वे स्थानकावर होता, असे त्याने सांगितले असल्यने पोलिसांनी त्याचे हे म्हणणे खरे, की खोटे हे तपासण्याचे ठरवले असून, या काळातील रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

COMMENTS