बेळगावप्रमाणे मुंबई महानगरपालिकेवरही भाजपचा भगवा दिसेल… राणेंनी शिवसेनेला डिवचले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेळगावप्रमाणे मुंबई महानगरपालिकेवरही भाजपचा भगवा दिसेल… राणेंनी शिवसेनेला डिवचले…

प्रतिनिधी : मुंबईमहाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने बाजी मारली . भाजपने 58 पैकी 35 जागांवर विजय मिळवून आपले वर्

13 राज्यांतील सर्वेक्षणात ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर 1’ LokNews24
राऊत यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही’; नीलेश राणे आक्रमक l LokNews24
नगरचे पोलिस राणेंना अटक करणार की नाही?; वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाईचे पोलिस निरीक्षकांचे संकेत

प्रतिनिधी : मुंबई
महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने बाजी मारली . भाजपने 58 पैकी 35 जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे . यावर विजयावर केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

बेळगाव महापालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकविला आहे .त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून भाजप सत्ता मिळवेल, बेळगावची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत दिसेल,

असा दावा करत नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे . ते पत्रकार परिषदेत बोलत होते .तसेच यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला .

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका आहे, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या मनात निर्माण करीत आहेत . कारण मुख्यमंत्र्यांना घरातच बसून काम करायचे आहे .

आता पर्यंत कोरोनाने राज्यात १.३७ लाख लोकांचा मृत्यू झाला . रुग्णांचा उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्टर नाहीत, लस नाही , अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . आता हे सरकार कोरोनाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांवर बंदी घालत आहे. पण, आम्ही सण साजरे करणार असेही राणे म्हणाले .

COMMENTS