Homeमहाराष्ट्रसातारा

बावधन बगाड यात्रा भरवल्याप्रकरणी छबिना पालखीच्या मानकर्‍यावरही गुन्हे दाखल

वाई तालुक्यातील बावधन ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांचा जमावबंदीचा आदेश झुगारून गनिमी काव्याने बगाड काढल्याप्रकरणी आणखी 13 जणांना ताब्यात घेतले आहे.

मुलाने वडिलांच्या मानेवर कुऱ्हाड घालून केली हत्या I LOKNews24
राम नवमी निमित्त आयोजित प्रभू श्रीराम यांची जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या हस्ते आरतीचे आयोजन 
स्कूल बसच्या चाकाखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू | LOK News 24

वाई / प्रतिनिधी : वाई तालुक्यातील बावधन ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांचा जमावबंदीचा आदेश झुगारून गनिमी काव्याने बगाड काढल्याप्रकरणी आणखी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. पहिल्या दिवशी अटक केलेल्या 83 जणांना जामीन मंजूर झाला असून छबिना काढल्याप्रकरणी पालखीचे 10 मानकरी व वाघजाईवाडी पालखीच्या चारजणांसह अज्ञातांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर प्रशासनाने दिलेला जमाव बंदीचा आदेश जुगारून भाविकांनी गनिमी काव्याने काशिनाथाच्या नावानं चांगभलं म्हणत उत्साहात यात्रा साजरी केली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करत बगाड्यासह 83 जणांना अटक केली होती. शनिवारी याप्रकरणी आणखी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले. बगाड मिरवणूक काढल्याने 106 लोकांची नावे समोर आली. अटक केलेल्या 83 जणांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर यांच्यासमोर उभे केले असता, पाच हजार रुपये वैयक्तिक जामीनावर त्यांना सोडण्यात आले. 

जमाव बंदीचा आदेश असतानाही गुरुवारी रात्री छाबिन्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रकरणी बावधनमधील पालखीचे दहा मानकरी व वाघजाईवाडी पालखीच्या चार जणासह अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली. बगाडाला सुमारे तीन हजार भाविकांचा जमाव उपस्थित असल्याचे पोलीस दफ्तरी नोंद केली आहे. 

बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी आदेशाचा भंग करणे, कोरोना संसर्ग प्रसारास कारणीभूत ठरणे, प्राण्यांना निर्दयीपणे वागवणे अशी कलमे लावण्यात आली आहेत. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी वाई पोलिस ठाण्यर्चीं भेट देवून अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली. बावधन गावाशी उदयनराजे भोसले यांचे नाते अतुट असल्याने बगाडप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्यांनी ग्रामस्थांसाठी पदरमोड करत त्यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली.

COMMENTS