बालाजीला केस अर्पण करणे पडले महागात, नोकरी गेली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालाजीला केस अर्पण करणे पडले महागात, नोकरी गेली

येथील एका उबर ड्रायव्हरला चक्क आपली हेअर स्टाईल बदलल्यामुळे नोकरी गमवावी लागली.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी निदर्शने तिसऱ्या दिवशीही कायम 
खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात शहरात निघणार मोर्चा – आमदार संजय शिरसाट
शिक्षकांच्या मागण्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्या मान्य – चंद्रशेखर बावनकुळे  

हैदराबादः येथील एका उबर ड्रायव्हरला चक्क आपली हेअर स्टाईल बदलल्यामुळे नोकरी गमवावी लागली. आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी यावी यासाठी त्याने नुकतीच भगवान तिरुपती बालाजी देवस्थानला  भेट दिली आणि प्रथेनुसार आपले केस तिथे अर्पण केले; मात्र आपण टक्कल केल्याचा असा फटका बसेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. परत आल्यावर त्याने उबरच्या पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फेशियल रिक्ग्नेशन सिस्टीममध्ये त्याचा चेहरा ओळखला गेला नाही.

COMMENTS