बायोडिझेलचा वाहनांत इंधन म्हणून वापर करणर्‍या तिघांविरुद्ध गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बायोडिझेलचा वाहनांत इंधन म्हणून वापर करणर्‍या तिघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी - बायोडिझेलचा वाहनामध्ये इंधन म्हणून वापर करण्यात आल्याचे रॅकेट उघड झाले आहे. पुरवठा विभागाने बाह्यवळण रस्ता (नेप्ती) येथे छापा टाक

श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
‘ऑक्सिजन पार्क’मधील ऑक्सिजन गायब… नागरिक आंदोलनाच्या तयारीत
खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर/प्रतिनिधी – बायोडिझेलचा वाहनामध्ये इंधन म्हणून वापर करण्यात आल्याचे रॅकेट उघड झाले आहे. पुरवठा विभागाने बाह्यवळण रस्ता (नेप्ती) येथे छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाई 4 हजार 536 लिटर बायोडिझेल आढळून आले आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18 रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक जयंत भिंगारदिवे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बाह्यवळण रस्ता येथील के 9 हॉटेलच्या बाजूस असलेल्या गाळ्यामध्ये अवैध बायोडिझेल शोध वापर व कार्यवाही पथकासह तपासणी केली असता, बाळासाहेब गोरख शिंदे (रा. सुडके मळा, बालिकाश्रम रोड) हा बायोडिझेलची विक्री नवनाथ जपकर यास पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये 36 लिटर बायोडिझेल विक्री करताना आढळून आला. हे बायोडिझेल मारूती ओमनी कारमध्ये (एमएम 12 एचएल 4274) ठेवत असताना आढळून आले. हे विक्रीचे केंद्र नेप्ती गावात गाळा क्रं. 34 येथे असून या जागेचा मालक अशोक कराळे (रा. केडगाव) आहे. या विक्री केंद्राच्या आत पथकाने जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी पांढर्‍या रंगाच्या टाक्यामध्ये 4 हजार 500 लिटर बायोडिझेल साठा आढळून आला. साठा करण्याबाबत सक्षम प्राधिकार्‍याची परवानगी घेतलेली नसल्याचे दिसून आले. तसेच विस्फोटक परवानाही नसल्याचे शिंदे याने पथकास सांगितले. शिंदे हा स्वत: मेट्रीक्स कंपनी लाईफ सायन्स (पैठण) येथून त्याच्या टेम्पोतून (एमएच 16 क्यू 2050) बायोडिझेलची वाहतूक केडगावपर्यंत विक्रीच्या ठिकाणी करून साठवणूक करून वाहनांना इंधन म्हणून विक्री करत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या मुद्देमालाचा पंचनामा पथकासमक्ष करण्यात आला,असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बाळासाहेब गोरख शिंदे (रा. सुडके मळा, बालिकाश्रम रोड), जागेचा मालक अशोक कराळे (रा. केडगाव) तसेच इंधन म्हणून बायोडिझेलचा वापर करणारा नवनाथ जपकर यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS