बापरे …! प्रेत रस्त्यावर ठेऊन चक्काजाम आंदोलन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बापरे …! प्रेत रस्त्यावर ठेऊन चक्काजाम आंदोलन (Video)

 पुलावरुन पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू  प्रेत रस्त्यावर ठेऊन चक्काजाम आंदोलन  कालची बातमी ताजी असतानाच हा अजून एक प्रकार घडला आह

अन्यथा महिला मुंडन करून सरकारचा निषेध करणार (Video)
Beed : “आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं” जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात रिपाईचे आंदोलन| LOK News24
Beed: न्यायालयाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव साजरा (Video)

 पुलावरुन पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू

 प्रेत रस्त्यावर ठेऊन चक्काजाम आंदोलन 

कालची बातमी ताजी असतानाच हा अजून एक प्रकार घडला आहे .  गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील अमृता नदीवरील तूटलेल्या पुलावरून पाय घसरून एक तरुण वाहून गेल्या ची घटना आज सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे .  ग्रामस्थांनी या तरुणाचे प्रेत रस्त्यावर ठेऊन चक्काजाम  आंदोलन सुरु केले . जो पर्यंत गेवराई तालुक्याचे आमदार,पालकमंत्री ,जिल्हाधिकरी येत नाही तोपर्यंत प्रेत हलवणार नसल्याचे सांगत प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जाणार आहे . काल आत्महत्या केलेल्या एका मुलीचा मृत्यूदेह खांद्यावर नेण्याची वेळ दुर्देवी पित्या वर आलेली असताना आज पुन्हा एक दुसरी दुर्दैवी घटना घडली असल्यामुळे.गावकर्यांनी जोपर्यंत विद्यमान लोकप्रतिनिधी, पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी येउनअमृता नदीवर पूल करण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही.अशी भूमिका गावकर्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतली आहे.गेल्या दोन वर्षांत हा चौथा बळी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात गावकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे.

COMMENTS