बहुजनांनो! भानावर या…..

Homeदखल

बहुजनांनो! भानावर या…..

देव देऊळ आणि बहुजन यांचे ऋणानुबंध पुरातन आहेत.बहुजनांचि श्राध्दा एकदा एखाद्या गोष्टीवर बसली की मरणाशिवाय त्या श्रध्देला कुणी हटवू शकत नाही,या निर्धार

पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!
मनोज जरांगे पाटील : इव्हेंट मॅनेजमेंट की सत्ता संघर्ष ?
आणखी एक पलटी !

देव देऊळ आणि बहुजन यांचे ऋणानुबंध पुरातन आहेत.बहुजनांचि श्राध्दा एकदा एखाद्या गोष्टीवर बसली की मरणाशिवाय त्या श्रध्देला कुणी हटवू शकत नाही,या निर्धारी श्रध्देचा बहुजनांना किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय असला तरी  झालेला तोटा लपून राहिलेला नाही.या श्राध्देचा फायदा उपटून बहुजन भावनांच्या बाजारावर अनेकांनी आपली दुकाने साजवली आहेत.बहुजन मात्र श्रध्देपलिकडे जाऊन वास्तवतेचे दर्शन घ्यायला राजी होत नसल्याने  मानसिक आणि आर्थिक गुलामगीरीतून बाहेर पडत नाही.कोरोना महामारीनंतरही सुरू झालेल्या देव देवळांच्या राजकारणाने बहुजनांना पुन्हा एकदा घेरले आहे.या मानसिकतेतून बाहेर पडून आतातरी बहुजनांनी भानावर यायला हवे.*लिड*
देव हे वास्तव आहे की कल्पना या प्रश्नाचे उत्तर एकविसाव्या शतकातही मिळत नाही.मात्र निसर्गाचे हे महाकाय रहाट नियंत्रीत करणारी कुणीतरी अदृश्य शक्ती नक्कीच आहे,यावर विज्ञानालाही शंका नाही.मात्र विज्ञान या शक्तीला देव मानायला तयार नाही.सामान्य माणूस ही शक्ती म्हणजेच देव असल्याचे आत्मविश्वासाने सांगतो.त्या शक्तीलाच पुजतो.या शक्तीवर त्याची नितांत श्रध्दा आहे.ही शक्ती कुठे दत्त म्हणून पुज्यनीय आहे.तर कुठे साई,बालाजी,हनुमान,श्रीराम ,दुर्गा माता ,आई भवानी,मरीआई,सटवाई,महादेव,विष्णू ,विठोबा माऊली अशी नाना नावे,रूपे धारण करून भारत भूमीवर या शक्तीची उपासना करण्यात बहुजन व्यस्त आहेत.श्राध्देला मोल नाही.या श्रध्देला परतावाही मिळत असल्याचा अनुभव अनेक भाविक दाव्यानिशी सांगतात.असो.प्रत्येकाची श्रध्दा आहे,या श्रध्देवर शंका घेण्याचा किंबहूना टिका करण्याचा कुठलाही हेतू नाही,कारण आमचीही कुठेतरी श्रध्दा आहेच.तथापी या श्रध्देचा अर्थ बहुजनांनी नीट समजून घेतला नाही किंबहूना तो समजू दिला नाही,या श्रध्देचे अवास्तव स्तोम माजविण्यासाठी पुरक वातावरण जाणिवपुर्वक तयार केले गेल्याने श्रध्देचा खेळखंडोबा तर झालाच ,सोबत बहुजनांनाही मानसिक आणि आर्थिक गुलामगीरीत ढकलले गेले.हा आमचा खरा आक्षेप आहे. बहुजनांच्या या श्रध्देवर देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो लाखो छोटी मोठी मंदीरं उभी राहीली आहेत. या  मंदीरांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख कोटी रूपयांहून अधिक असल्याची आकडेवारी सांगतले जाते,नक्कु हिशेब मात्र कुणाकडेच नाही,एका वर्षात केंद्र सरकार जेव्हढा जीएसटी वसूल करते तेव्हढे हे मंदीरांचे उत्पन्न असल्याचे सांगीतले जाते.देवदेवळांच्या इतर  स्थावर मालमत्ता, अब्जावधी रुपयांचे जडजवाहीर, दागिने यांचा  तर हिशेबच नाही.ही सारी कमाई कुणाची आहे? बहुजनांनी श्रध्देपोटी दिलेले हे दान आहे,म्हणजेच गोर गरीब दीन दलीत दुबळे जे विविध समस्यांनी  पिचलेले आहेत त्यांनीच श्रध्देने दिलेल्या दानातून ही संपत्ती उभी राहीली असल्याने या मंडळींचाच या संपत्तीवर पहिला अधिकार आहे प्रत्यक्षात मात्र या संपत्तीचे मालक भलतेच आहेत.हा वर्ग जेंव्हा संकटात असतो तेंव्हाही या संपत्तीचा फायदा दिला जात नाही,हा खरा कळीचा मुद्दा आहे.
या संपत्तीला खरे तर राष्ट्रीय संपत्ती घोषीत करून त्याचा विनियोग विकासाची गंगा प्रवाहीत करण्यासाठी व्हायला हवा.निदान हिंदू राष्ट्र म्हणून खऱ्या अर्थाने या देशाची मांडणी करण्याची इच्छा आहे त्या मंडळींनी तरी या दिशेने पाऊले टाकण्याचे धाडस दाखवायला हवे.डॉ. पंजाबराव देशमुख यांनी  देवस्थानांची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने “हिंदू देवस्थान संपत्ती बिल” मांडून तसे धाडस दाखवले होते पण  ते नामंजूर करण्यात आले.प्रबोधनकार ठाकरे यांनीही या मुद्यावर अशा लुटारू प्रवृत्तीवर सातत्याने घणाघात करतांना “देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे” या पुस्तकातून भिक्षुकशाहीच्या अनिष्ठ प्रथेचे विच्छेदन करणारी जहाल भाषा वापरली आहे. देवळात एवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे, तिचा उपयोग देशोद्धारासाठी व्हावा असे मत मांडले आहे.हे सारे या ठिकाणी जाणीवपुर्वक उधृक्त करण्याचे प्रयोजन एव्हढेच की सध्या बंद असलेली मंदीरे उघडण्यासाठी सरकारवर दबाव तंत्रांचा प्रयोग सुरू आहे,हा प्रयोग करणारे जादूगार कोण आहेत,हे वेगळे सांगण्याची गरज नाही,सामान्य माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या प्रयोगाचे खेळ ठिकठिकाणी हाऊसफुल्ल सुरू आहेत,या गर्दीत पुन्हा बहुजन हेच प्रमुख कलाकाराच्या भुमिकेत दिसतात म्हणून हा सारा प्रपंच.  ‘मंदिर उघडा’ असा नारा देऊन सुरू असालेली आंदोलने राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. आंदोलन करून त्याचा उपयोग राजकारणासाठी करण्याचे हिन कृत्य जोरावर आहे. शब्दांचा खेळ करून दिशाभूल करायचा ही त्यांची जुनीच पद्धत आहे. सामान्यांच्या भावनांचा बाजार मांडून मारलेल्या बोंबांना शंखनादाची उपमा देण्याचा बौध्दीक खेळ खेळला जात आहे.बहुजनांचे वाचन नसल्यामुळे किंवा राजकीय महत्वकांक्षेपायी त्यांची विवेकबुध्दी मंद झाली आहे.मंदीर उघडण्याची नव्हे तर मंदीरातील तिजोरी उघडण्याची आता खरी गरज आहे हे या मंडळींच्या लक्षात येत नाही.आपल्या प्रत्येकाच्या घरात देव्हारा आहेच की,अत्र तत्र सर्वत्र वाव असणारा देव देव्हाऱ्यातही आहे तिथे पुजा करून देव पावत नाही का? मंदीरातच कशाला जायला हवे. असा प्रश्न या मंदीरांचे मुखत्यारपत्र घेतलेल्या मंडळींना बहुजनांनीच विचारायला हवा.या देशात सीएसआर फंडाचा कायदा लागू आहे.कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्यानी आपल्या नफ्यातील काही वाटा (१ते२%) समाजोपयोगी उपक्रमावर खर्च करावा असे बंधन कार्पोरेट सोशल रिस्पाॕन्सीबिलीटी कायाद्यान्वये घालण्यात आले आहे.तसा कायदा देवस्थानांच्या उत्पन्नावरही का लावला जात नाही? देवस्थानांचा अमर्याद, छुपा काळा बेहिशेबी उत्पन्नाचा पैसा , मालमत्तांच्या वर्गीकरणानुसार त्यांना 10%, 20% व 30% टॅक्स लावण्यात येऊन त्याचा विनियोग फक्त मातीतून अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि शहरी व ग्रामीण विकासात असलेली प्रचंड तफावत दूर करण्यासाठी वापरला गेला तर मंदीर उघडा चळवळीचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.

COMMENTS