Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बहिणीला त्रास देत असल्याने खून केल्याची कबूली

सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे एक जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

अकोल्यात दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
लष्करी जवानाच्या गोळीबारात दोन नागरिक ठार
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी

अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या हत्येचा उलगडा 

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे एक जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत खबर्‍याच्यार्फत तसेच गोपनीय माहीतीद्वारे गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्यातील मयत इसमाचे आकाश राजेंद्र शिवदास (रा रामनगर, ता. जि. सातारा) असे असल्याचे निष्पन्न झाले. तर विक्रांत ऊर्फ मन्या उमेश कांबळे यांच्या बहिणीला त्रास देत होता. या कारणावरून चिडून जाऊन विक्रात याने 6 मार्च रोजी मध्यरात्री खंडोबाचा माळ येथे डोक्यात दगड घालून मयत आकाश यांचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याचे विक्रांत याने सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर परिसरातील साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करून गोपनीय माहिती प्राप्त केली. तेव्हा हा इसम आकाश राजेंद्र शिवदास (रा. रामनगर, ता. जि. सातारा) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मयत व्यक्तीचे कोणाशी वैर अगर भांडणे आहे काय याची माहिती घेतली. त्यावेळी संशयितांना ताब्यात घेऊन त्या इसमाच्याकडे सखोल चौकशी केली असता. मयत आकाश उर्फ रॉजर राजेंद्र शिवदास हा विक्रांत ऊर्फ मन्या कांबळे यांच्या बहिणीचा त्रास देत होता. या कारणावरून चिडून जाऊन त्यास 6 मार्च रोजी मध्यरात्री खंडोबाचा माळ येथे डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांना जळालेला मृतदेह पुरुष की स्त्री याबाबत खात्री होत नव्हती. तसेच कोणताही पुरावा नसताना अत्यंत कमी वेळात मयताची ओळख पटवून गोपनीय माहिती बातमीदारांच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास कौशल्याचा वापर करून विचारपूस करून सदर किल्ष्ट गुन्हा तीन तासांत उघडकीस आणला.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली तपास पथकाने आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला.

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, सहाय्यक फौजदार ज्योतिराम बर्गे, उत्तम दबडे, पोलीस हवलदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सानप, पोलीस नाईक शरद बेबले, साबिर मुल्ला, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, प्रवीण पवार, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल रोहित निकम, सचिन ससाने, विशाल पवार, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, गणेश कचरे, पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला होता. गुन्ह्यांच्या तपासामध्ये सिव्हिल हॉस्पिटल सातारचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी सहकार्य केले.

COMMENTS