अहमदनगर/प्रतिनिधी: चार वर्षापूर्वी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे अ
अहमदनगर/प्रतिनिधी: चार वर्षापूर्वी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई राहुरी बसस्थानकाजवळ केली. याबाबतची हकिगत अशी कि, दि. 12 एप्रिल 2018 रोजीचे मध्यरात्री अंकुश बर्डे (रा.बारागाव नांदूर, ता. राहुरी) याने व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून बारागाव नांदूर येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अंकुश बर्डे फरार होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हे जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी अंकुश बर्डे हा राहुरी बस स्टँड परिसरात येणार आहे. ही माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अंकुश बर्डे यास ताब्यात घेवून राहुरी पोलिस ठाण्यात हजर केले. पुढील कारवाई राहुरी पोलिस करीत आहेत.
COMMENTS